चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकणे पडले महागात; सरपंचासह ९ जणांवर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > क्राईम डायरी > ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकणे पडले महागात; सरपंचासह ९ जणांवर गुन्हा दाखल
क्राईम डायरी

ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकणे पडले महागात; सरपंचासह ९ जणांवर गुन्हा दाखल

प्रकरण: सावरी ग्रामपंचायतीचे

चौफेर वार्ता
Last updated: May 6, 2026 7:42 pm
चौफेर वार्ता
Share
फाईल फोटो
SHARE

लाखनी : लोकशाहीत कायद्याचे राज्य सर्वोच्च असताना, सावरी-मुरमाडी ग्रामपंचायत कार्यालयाला बेकायदेशीरपणे कुलूप ठोकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे प्रकरण आता नऊ जणांना चांगलेच महागात पडले आहे.

हेही वाचा : घरकुलाचा निधी कधी जमा होणार? लोकप्रतिनिधींचे मौन, गरिबांचे स्वप्न अधांतरी

गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने दोषी ठरवल्यानंतर, लाखनी पोलिसांनी सरपंच सचिन भिकाराम बागडे (वय ४५) यांच्यासह मंगेश धांडे (वय ३६), मोहन रेहपाडे (वय ४५), आदित्य बागडे (वय ३२), सुरेखा चाचेरे (वय ४५), पुष्पा वंजारी (वय ५५), विनोद चाचेरे (वय ४८), संजय वंजारी (वय ५६) आणि विनोद चकोले (वय ४५) सर्व रा. सावरी/मुरमाडी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२१, १८९(२) व १२६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

विलंबानंतर अखेर कारवाईचा बडगा

काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय चौकशीचा अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या. ग्रामपंचायत अधिकारी संगीता वसंत मारवाडे (४१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : कोट्यवधींचा हिशोब गुलदस्त्यात! जल जीवन मिशनच्या ‘काळ्या’ कामावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न?

२४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:३५ वाजताच्या सुमारास आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बळजबरीने बाहेर काढले होते. त्यानंतर कार्यालयाला कुलूप लावून शासकीय कामकाज बंद पाडले होते. गटविकास अधिकारी, पंचायत समिती लाखनी यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय समितीने या घटनेची सखोल चौकशी केली. या चौकशीत आरोपींनी केलेले कृत्य सिद्ध झाल्याचा निष्कर्ष निघताच पोलीस कारवाईचे आदेश देण्यात आले.

सत्तेच्या गुर्मीला कायद्याचा लगाम

लोकशाहीत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित असताना, थेट शासकीय कार्यालयाला कुलूप लावण्याची ‘मुजोरी’ ग्रामपंचायत सावरी येथे घडली होती. प्रशासनाने घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींमधील दबावाचे राजकारण करणाऱ्यांना चपराक बसली आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास लाखनी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रतीक बोरकर करीत आहेत.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article भंडाऱ्यात व्हॉईस ऑफ मीडियातर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार
Next Article लाखनीत सुगंधी तंबाखूची अवैध उलाढाल जोमात
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account