चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: शेजारी राहणाऱ्या नराधमाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > क्राईम डायरी > शेजारी राहणाऱ्या नराधमाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
क्राईम डायरी

शेजारी राहणाऱ्या नराधमाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लाखनी पोलिसात आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

चौफेर वार्ता
Last updated: May 8, 2026 10:14 pm
चौफेर वार्ता
Share
File Photo
SHARE

लाखनी : शेजारच्या घरी भाजी मागण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५० वर्षीय नराधमाने बळजबरीने अत्याचार केल्याची संतापजनक घटना लाखनी पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे. या पाशवी कृत्यामुळे पीडित मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली असून, लाखनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध ‘पोक्सो’सह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. रतनलाल उर्फ जागेश्वर सुरचंद कुळमते (वय) असे आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये पीडिता आरोपी रतनलाल उर्फ जागेश्वर सुरचंद कुळमते (५०) याच्या घरी भाजी मागण्यासाठी गेली होती.पीडिता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही, आरोपीने फायदा घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला व तुझ्या आई-वडिलांना जीवे मारून टाकेन. अशी धमकी आरोपीने दिली होती.यामुळे पीडिता कमालीच्या दहशतीखाली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पीडितेच्या प्रकृतीत बदल जाणवू लागल्याने कुटुंबियांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या धक्क्यातून सावरल्यानंतर पीडितेच्या (४५) वर्षीय वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोपी रतनलाल कुळमते याच्याविरुद्ध लाखनी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक २७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१), ६५ (१), ३५१ (३) तसेच पोक्सो कायदा कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष बारसे करीत आहेत.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article लाखनीत सुगंधी तंबाखूची अवैध उलाढाल जोमात
Next Article लाखनीत आयपीएल सट्टेबाजीवर अभय कुणाचे? ‘पांढरपेशी’ सूत्रधारांची चर्चा जोरात!
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account