चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: शंकरपटाचे उत्साही आयोजन; वधू-वर संशोधन व लोककलेची मेजवाणी
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > चौफेर वार्ता > शंकरपटाचे उत्साही आयोजन; वधू-वर संशोधन व लोककलेची मेजवाणी
चौफेर वार्ता

शंकरपटाचे उत्साही आयोजन; वधू-वर संशोधन व लोककलेची मेजवाणी

जत्रा व लोककलांचा आनंदोत्सव

चौफेर वार्ता
Last updated: January 9, 2026 7:29 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : गुगल
SHARE

>>>अतुल नागदेवे | लाखनी

नववर्षाच्या सुरुवातीला विदर्भातील ग्रामीण भागात शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने शंकरपट साजरा करतात. यानिमित्ताने रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. घराघरात पाहुण्यांची गर्दी होते आणि गावांना जत्रेचे स्वरूप येते. नववर्षाच्या निमित्ताने पाहुणे येतात तेव्हा वधू-वर शोधण्याचा उपक्रमही जोमात सुरू होतो.

नववर्षानंतर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शंकरपट हा सर्वात प्रतीक्षित सण असतो. व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त बाहेर असलेले गावकरी आपल्या मूळ गावी परत येतात. हा सण नवीन नातेसंबंध जोडण्यासाठी आणि वर्षभराच्या कष्टानंतर विश्रांती व आनंद मिळवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.

लाखनी तालुक्यातील गावांमध्ये टप्प्याटप्प्याने शंकरपट आयोजित केले जातात. यात झाडीपट्टी नाटक, लावणी यांसारख्या लोककला सादर होतात आणि समाजप्रबोधन होते. आजकाल ऑर्केस्ट्रा व हंगाम्याचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. गावात विविध दुकाने थाटली जातात, खरेदी-विक्री होते. नातेवाईक जमा होतात आणि पाहुण्यांचा मांसाहारासह गोडधोड पदार्थांनी पाहुणचार केला जातो. यामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळते व मोठी आर्थिक उलाढाल होते.

शंकरपटात लोककलांचा आस्वाद

रेंगेपार/कोठा येथे ७ ते ९ जानेवारी या कालावधीत तीन दिवसीय शंकरपट आयोजित करण्यात आला. यात ८ जानेवारीला लावणी कार्यक्रम सादर झाला. परिसरातील नागरिकांनी याचा आनंद घेतला. पट समितीचे अध्यक्ष प्रदीप बोरिकर, उपाध्यक्ष गंगाधर काडगाये, राजू सार्वे, सुरेश तितीरमारे, महेश हजारे, धनंजय लोहबरे यांच्यासह गावकऱ्यांनी सहकार्य केले.

ग्रामीण भागात शंकरपटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यानिमित्ताने सोयरिकीच्या चर्चा जोर धरतात. विवाहयोग्य तरुण-तरुणींसाठी हा सण पर्वणी ठरतो. भावी जोडीदार शोधण्यासाठी हे केंद्रस्थान बनते आणि नववर्षात लग्नाच्या योजना आखल्या जातात. घरोघरी मुली-जावई, नातेवाईक येतात, गाव जत्रेसारखे गजबजते. पाहुणे सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतात आणि वधू-वर शोधण्यात रमतात. शंकरपट हा विदर्भातील पारंपरिक बैलगाडा शर्यतीचा प्रकार असून, यात जोड्या सेकंदाच्या आधारावर स्पर्धा करतात.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article गौण-खनिज माफियांना अभय कुणाचे?
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account