चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: साकोली विधानसभेत “लाडक्या बहिणीला”  प्रतिनिधित्व मिळणार काय?
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > चौफेर वार्ता > साकोली विधानसभेत “लाडक्या बहिणीला”  प्रतिनिधित्व मिळणार काय?
चौफेर वार्ताराजकारण

साकोली विधानसभेत “लाडक्या बहिणीला”  प्रतिनिधित्व मिळणार काय?

चौफेर वार्ता
Last updated: September 6, 2024 9:28 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

अनोखी बडघरे चौफेर वार्ता | महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकदाही साकोली विधानसभा मतदार संघातून महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही.आगामी निवडणुकीतही तशी संधी मिळण्याची शक्यता दिसत नाही. लोकसंख्येत बरोबरी असतानाही पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांवर अन्याय होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आगमी विधानसभा निवडणुकीत साकोली मतदारसंघात लाडक्या बहिणीला प्रतिनिधित्व मिळेल काय? हा प्रश्न चर्चेत आहे.

साकोली विधानसभा मतदारसंघ हा राज्याच्या अगदी टोकावरील मतदारसंघ आहे. राजकीयदृष्ट्या जागरुक मतदार संघाचे नेतृत्व अनेक दिग्गजांनी केले आहे. मात्र १९६२ पासून आतापर्यंत एकदाही महिला आमदार या मतदारसंघातून विधानसभेत गेली नाही.त्यामुळे यावेळी तरी लाडकी बहिण विधानसभेत जाणार का? अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
       
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर भंडारा व गोंदिया हा एकच जिल्हा होता.त्यावेळी जिल्ह्यात भंडारा, गोरेगाव,आमगाव,साकोली, लाखांदूर,अड्याळ, तुमसर, तिरोडा, गोंदिया असे नऊ विधानसभा मतदारसंघ होते. मात्र कालांतराने जिल्ह्याचे विभाजन झाले.

आता भंडारा जिल्ह्यात तुमसर,भंडारा आणि साकोली हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.बहुतांश निवडणुकांमध्ये पुरुषांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे सक्षम असल्या तरी महिलांना राजकीय पक्षांनी प्रतिनिधीत्व देताना डावलल्याचे दिसून येते.

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ६४ वर्षाचा कालावधी लोटला आहे. परंतु तालुक्यातील महिलांचे नेतृत्व म्हणावे तसे पुढे आले नाही. त्यामुळेच कोणत्याही पक्षाने विधानसभेची उमेदवारी देताना महिलांच्या नावाचा विचार केला नाही.
        
साकोली हा राजकीयदृष्ट्या जागरूक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.परंतु या मतदार संघाने अद्यापही आमदार म्हणून महिलेला विधानसभेत पाठवले नाही.निम्मी लोकसंख्या महिलांची असतांनाही राज्याच्या स्थापनेपासून एकदाही महिलेला या मतदारसंघात प्रतिनिधित्व करण्याची संधी कोणत्याही राजकीय पक्षाने दिली नाही.मात्र, यावेळी कोणता पक्ष लाडक्या बहिणीला संधी देतो हे बघणे महत्वाचे आहे.

आतापर्यंत साकोली विधानसभेचे आमदार

अडकूजी पाऊलझगडे  – काँग्रेस – १९६२
श्यामराव कापगते – जनसंघ – १९६७
मार्तंडराव कापगते – काँग्रेस – १९७२
मधुकर बेदरकर – काँग्रेस आय – १९७८
जयंत कटकवार – काँग्रेस आय – १९८०
जयंत कटकवार – काँग्रेस – १९८५
डॉ हेमकृष्ण कापगते – भाजप – १९९०
डॉ हेमकृष्ण कापगते – भाजप – १९९५
सेवक वाघाये – काँग्रेस – १९९९
सेवक वाघाये – काँग्रेस – २००४
नाना पटोले – भाजप – २००९
राजेश काशीवार – भाजप – २०१४
नाना पटोले – काँग्रेस – २०१९

     
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०टक्के आरक्षण दिले जात असले तरी साकोली विधानसभा क्षेत्राच्या उदाहरणातून हे दिसून येते की, आजपर्यंत एकाही महिलेला उमेदवारी दिली गेली नाही. महाराष्ट्र सरकारची “लाडकी बहीण योजना” सध्या खूप चर्चेत आहे.

परंतु फक्त अल्प मानधन या आधारावर महिलांचा सन्मान करणे पुरेसे नाही.खऱ्या अर्थाने महिलांचा सहभाग वाढवायचा असेल, तर त्यांना विधानसभेत आणि विधानपरिषदेत स्थान द्यावे लागेल.महिला निवडून आल्यास त्या महिलांच्या समस्या आणि गरजा समजून घेऊन त्यांच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने कार्य करू शकतात, कारण त्यांनी स्वतः ते आयुष्य अनुभवलेले असते

  डॉ. मनिषा निंबार्ते
जि.प.सदस्य भंडारा

       
सामाजिक,राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेवर पुरुषप्रधानतेचा पगडा असतांना, महिला अबला नाही,तर सबला आहेत.आजची महिला स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करीत आहे. परिवर्तनशीलतेच्या बाबतीत  महिला सरस आहेत.म्हणूनच  महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली.

मात्र आजही राज्याच्या राजकारणात  महिलांना पाहिजे ती संधी दिली जात नाही.साकोली विधानसभा क्षेत्रात आजपर्यंत कोणत्याच पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नाही.विधानसभा आणि लोकसभेत प्रतिनिधित्व करू शकणाऱ्या महिला नेत्यांची कमतरता नाही.परंतु महिलांना संधी मिळत नाही.जर महिलांना संधी दिली गेली तर मतदानात महिलांच्या टक्केवारीत नक्कीच वाढ होईल.
    

  डॉ .विजया ठाकरे/नंदुरकर
    जिल्हा सचिव,भाजपा भंडारा

TAGGED:BjpCongresMaharashtravidhansabha
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article भावी मुख्यमंत्र्यांच्या भवितव्याचा फैसला विदर्भाच्या हाती?
Next Article महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिंदे, अजितदादा घेणार
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account