चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: नानांच्या विरोधात कोण गाजवणार मैदान? काँग्रेसचे एक पाऊल पुढे
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > राजकारण > नानांच्या विरोधात कोण गाजवणार मैदान? काँग्रेसचे एक पाऊल पुढे
राजकारणविदर्भ

नानांच्या विरोधात कोण गाजवणार मैदान? काँग्रेसचे एक पाऊल पुढे

महायुतीचे घोडे उमेदवारीत अडले

चौफेर वार्ता
Last updated: October 23, 2024 3:28 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी

बहुचर्चित व लक्षवेधक साकोली विधानसभा मतदारसंघात दोनदा आमदार असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांना यंदा पराभूत करायचेच असा चंग बांधलेल्या महायुतीचे विशेषकरून भाजपचे घोडे उमेदवार निवडीतच अडले आहे. आमदार नाना पटोले यांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे. दुसरीकडे नानांच्या विरोधात भाजपकडून कोणाचे नाव निश्चित होणार याची उत्सुकता आहे.

काँग्रेस व भाजपला संमिश्र यश देणारा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या साकोली मतदारसंघात आमदार नाना पटोले यांनी आपली पकड मजबूत केली आहे. २००९ भाजप, २०१४ ला भाजपकडून लोकसभा , तर २०१९ ला काँग्रेसकडून विधानसभा अशा निवडणूक लढवून पटोले यांनी साकोली विधानसभा क्षेत्रात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. 

यावेळी मात्र भावी मुख्यमंत्री म्हणून ते तिसऱ्यांदा साकोली विधानसभेची निवडणूक काँग्रेसकडून लढत आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच यादृष्टीने ते व त्यांची यंत्रणा तयारीला लागली आहे. सत्तेचा पुरेपूर वापर करून आपले ईप्सित साध्य करण्यात त्यांचा हातखंडा त्यांनी कायम राखला आहे.

विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण दौरा पूर्ण करून त्यांनी आपली निवडणुकीची तयारी पूर्ण करत आणली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आशिर्वाद व वरिष्ठांचा सोबत असलेला वरदहस्त त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आमदार पटोले सज्ज झाले आहेत. दुसरीकडे महा‌युतीचे म्हणजे भाजपचे  घोडे उमेदवारीवरच अडकले आहे.

महायुतीतील मोठा पक्ष भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने रस्सीखेच सुरू आहे. लाडकी बहीण व मतांच्या सन्मान सोहळ्यांचे जोरदार इव्हेंट करून त्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढला आहे. यासोबतच गावोगावी विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाका लावून कार्यकर्ते चार्ज केले आहेत.

पटोले यांनी २५ वर्षात कोणता विकास केला हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन ते पुन्हा एकदा मतदारांना सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, महायुतीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुक्ता दिवसागणिक वाढत आहे. उमेदवारीबाबत विविध चर्चाना उधाण आले असून, सर्वांचे लक्ष भाजप श्रेष्ठी यांच्या निर्णयाकडे आहे. भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

साकोली मतदारसंघ याला अपवाद नाही. या मतदारसंघातून अनेक मातब्बर विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी शड्डू ठोकून सज्ज झाले आहेत. प्रत्येकाच्याच मोठ्या प्रमाणात जोर बैठका सुरू आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत विजयाने निसटती हुलकावणी दिलेले माजी पालकमंत्री हे उमेदवारी कुणाला द्यायची व कुणाला द्यायची नाही यावरून यावेळी श्रेष्ठींजवळ झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका बजावत असल्याची भाजप मध्ये चर्चा आहे.

साकोली मतदारसंघातील इच्छुक आपल्या कार्यकर्त्यांसोबत गेली पाच वर्षे ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सोसायटी आदी निवडणुकांच्या माध्यमातून कार्यरत आहेत, सध्या त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून, आपली दावेदारी मजबूत केली आहे. भंडारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीच्या झोतात आलेले माजी आमदार बाळा काशीवार व  सोमदत्त करंजेकार यांनीही वरिष्ठांना त्यांची दखल घेणे भाग पाडले आहे.

विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते जनतेसमोर गेले आहेत. माजी आमदार काशीवार व करंजेकार यांनी गाठीभेटींसह प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. हा मतदारसंघ भाजरचा असून,भाजप निष्ठावंतालाच उमेदवारी मिळावी, यादृष्टीने भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी हे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे साकोली मतदारसंघातून नाना पटोले  यांच्या विरोधात महायुतीचा हुकमाचा एक्का कोण याची उत्सुकता ताणली गेली आहे.

बाळा काशीवारच्या जमेच्या बाजू

•२०१४ मध्ये भाजपच्या तिकिटवर लढून विजय मिळवला.

  • गावागावांत कार्यकर्त्यांची फळी.
    •मतदारांना प्रभावित करणारी वक्तृत्व शैली.
  • लाडकी बहीण व मातांच्या सन्मान सोहळ्यांचे भव्य आयोजन.
  • पाच वर्षाच्या कार्यकाळात विविध विकासकामे केली

सोमदत्त करंजेकर यांच्या जमेच्या बाजू

  • मतदारसंघात तयार झालेले सकारात्मक वातावरण
  • मतदारांना प्रभावित करणारे व्यक्तीमत्व
  • मितभाषी, उच्चशिक्षित व सामाजित कार्यात सदैव अग्रेसर
  • शिक्षणसम्राट म्हणून परिसरात सुपरिचीत

नाना पटोलेंच्या जमेच्या बाजू

  • लोकसभा निवडणुकीतील २५ वर्षानंतर काँग्रेसचा विजय
  • समाजाची साथ मिळण्याची शक्यता
  • पक्षात कुणीच प्रतिस्पर्धी नसल्याने विजय सोपा होण्याची शक्यता
  • कार्यकर्त्यांची मोठी फळी
  • भावी मुख्यमंत्री म्हणून जनतेची पसंती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article सर्व्हेत साकोलीची जागा राखू शकणार नाहीत म्हणून महायुतीकडून राष्ट्रवादी?
Next Article भरदिवसा चाकूच्या धाकावर फळविक्रेत्या महिलेस लुटले; पोलिसांत गुन्हा दाखल
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account