>>>>>संदीप नंदनवार | भंडारा चौफेर
राजकीय क्षेत्रात सर्वच लोकप्रतिनिधींना विविध राजकीय टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र, जेव्हा भंडारा गोंदियाच्या राजकीय क्षेत्रात नाना पटोले यांच्यावर राजकीय टीकेचा भडीमार होतो, तेव्हा दोन्ही जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदारांनी संघटित होऊन स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून नानांना भरघोस मतांनी विजय मिळवून दिला. परंतु, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्या निवडणुकीतील पराभवावर राजकीय टीकास्त्र सोडले जात आहे.
हेही वाचा : जन पळभर म्हणतील हाय हाय, कार्यकर्तेच नाही राहिले तर नेता करील काय ?
त्यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये टीकाकारां विरोधात राजकीय संतापाची भावना दिसून येत आहे. या स्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांच्या विश्वासाला तडा जात असताना दुप्पट वेगाने नाना पुन्हा विरोधक व टीकाकारांना सामोरे जाणार असल्याची चर्चा आहे.
भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात नाना पटोले यांचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळत आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत नानांनी सर्वसामान्य मतदारांसोबत आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.
हेही वाचा : सध्याच्या राजकारणात विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर… अन सच्चे कार्यकर्ते उष्ट्या वाटीवर
तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात डमी उमेदवार उभे केल्याने नानांवर विविध अपक्ष उमेदवारांसह भाजप नेत्यांनी टीका केली होती. पण वरील सर्व टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत नानांनी सर्वसामान्य मतदारांशी थेट संपर्क साधून दोन्ही उमेदवारांचा विजय नोंदवला होता.
हेही वाचा : भावी आमदार ! साकोली मतदारसंघात आता ‘या’ जि. प. सदस्याचे झळकले बॅनर
एकूणच नाना पटोले यांची सर्वसामान्य जनतेशी असलेली थेट ओळख यामुळेच वर उल्लेखिलेल्या सर्व राजकीय लढाया जिंकण्यात नाना यशस्वी होत आहेत. एवढेच नाही तर गेल्या काही वर्षात साकोली विधानसभा मतदारसंघातील काही आयाराम नेते दादागिरीच्या चमत्कारामुळे आमदार म्हणून राजकीय क्षेत्रात जन्माला आल्याचीही चर्चा आहे.
प्रत्येक वेळी केले जाते नानांना टार्गेट
ओबीसी आणि बहुजन समाजाचे नेते म्हणून नाना पटोले यांचा प्रभाव गेल्या काही वर्षांत राजकीय क्षेत्रात दिसून येत आहे. या प्रतिमेमुळे नानांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : विधानसभा निवडणुकीसंदर्भात राजकीय हालचालींना वेग
ओबीसी जातीच्या जनगणनेबाबत नानांनी अनेकदा सरकारविरोधात आक्रमकता दाखवली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी नानांच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचून त्यांना टार्गेट केले जात असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसवाल्यांना सतर्क राहावे लागेल
सर्वसामान्यांबद्दल असलेल्या आपुलकीमुळे नाना पटोले यांचा सर्वाधिक प्रभाव भंडारा आणि गोंदियामध्ये दिसून आला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातही त्यांचे वर्चस्व दिसून येत आहे. मात्र हे वर्चस्व कमी करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते व अधिकारी सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचा राजकीय डाव रात्रंदिवस रचत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसजनांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचीही चर्चा आहे.
बऱ्याच वर्षांनी मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल
अनेक वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील नाशिकराव तिरपुडे नावाच्या दलित नेत्याला राज्याचे उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील एकाही आमदाराला राज्यप्रमुखपदाची संधी मिळाली नसल्याची माहिती आहे. मात्र गेल्या काही वर्षात राज्यातील विविध पक्षांमधील राजकीय पेचप्रसंगामुळे राज्यातील काँग्रेस पक्षांतर्गत नाना पटोले यांच्यावर अधिक विश्वास दाखविल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : ‘लाडकी बहिण’ योजना म्हणजे मतांसाठी केलेला जुगाड
मात्र, या भरवशावर राहून नानांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठे यश मिळाले. वरील यश आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम राहण्याची अपेक्षा आहे. ज्या अंतर्गत अनेक वर्षांनंतर भंडारा जिल्ह्यातून राज्याला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते.

