>>>>अनोखी बडघरे | भंडारा चौफेर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात महाविकास आघाडी व महायुतीत जागा वाटपावरून चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची स्थिती आहे. अशातच तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : बुलेट राजाच्या परिवर्तन यात्रेत नवं ते काय?
याविषयी माजी आमदार वाघमारे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. चरण वाघमारे हे अनुभवी नेते आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदललेत.
त्यांच्या एवढा अनुभवी नेता दुसरा कोणताही नाही. त्यांनी प्रहार संघटनेच्या उमेदवारीचीही मागणी केली आहे. त्यामुळे त्यांनी प्रथम आमच्या पक्षाची ५० रुपयांची पावती फाडावी व त्यानंतर उमेदवारी मागावी. असे मत शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा : भावी उमेदवारांनी घेतला ‘लिफाफा सर्व्हे’ चा धसका?
दरम्यान, पूर्व विदर्भातील भंडारा हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचा गृहजिल्हा आहे. आ. पटोले यांनी भंडारा – गोंदियातील जागा सोडण्यास तयार नाहीत अशी माहिती स्वतः शरद पवारांनी दिल्याची माहिती शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी दिली आहे.
ते म्हणाले, महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप झाले नाही. आ. पटोले भंडारा गोंदियाची एकही जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे पक्षाला येथील एखादी जागा मिळते किंवा नाही याविषयी साशंकता आहे. स्वतः शरद पवारांनी हे सांगितले आहे.
महाराष्ट्रातील अनेक जण आम्हाला भेटण्यासाठी येतात. आपली प्रोफाइल दाखवतात. पण भंडाऱ्यासाठी बाहेरचा कुणीही आमच्या संपर्कात नाही. कारण, निष्ठावंतांना डावलणार नसल्याचा शब्द स्वतः शरद पवारांनी दिला आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी यावेळी महाविकास आघाडीने भंडारा जिल्ह्यात कोणताही उमेदवार दिला तरी आघाडी धर्म म्हणून त्यांना निवडून आणण्याचे काम केले जाईल असेही स्पष्ट केले.
काँग्रेसचा भंडारा-गोंदियाच्या ७ जागांवर दावा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. पटोलेंनी भंडाऱ्यासह लगतच्या गोंदिया जिल्ह्यातील ७ जागांवर दावा ठोकून महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कोंडीत पकडले आहे. उद्धव ठाकरे गटाने भंडारा, तर शरद पवार गटाने तुमसर, भंडारा, अर्जुनी मोरगाव व तिरोडा या ४ जागांवर दावा केला आहे.
हेही वाचा : सत्तेच्या पटलावरही ‘नवदुर्गा’ मोठ्या संख्येने प्रस्थापित व्हावी
पण नाना पटोले या दोन्ही जिल्ह्यांतील एकही जागा या पक्षांना देण्यास तयार नाहीत. त्यामुळे ठाकरे व पवार गटाची अडचण झाली आहे. पण पवारांनी या प्रकरणी मोठे मन दाखवत येथील कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.