भंडारा जिल्ह्यातील एका विधानसभेतील माजी आमदारांचा वाढदिवस त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी धडाक्यात साजरा केला.यानिमित्त्याने त्यांच्या वाढदिवसाचे स्टेटस शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईलवर ठेवले. मात्र, कार्यकर्त्यांनी व्हाटसॲपवर ठेवलेले स्टेटस काढून टाकण्याचे फर्मान त्यांच्याच पक्षातील स्वनामधन्य नेत्याकडून फोनोफानी करून कार्यकर्त्यांना सांगितले असल्याच्या चर्चेला जिल्ह्यात उधाण आले आहे.
हेही वाचा | बाळाभाऊंच्या वाढदिवसाला आमदारकीच्या शुभेच्छा!
वाढदिवस म्हणजे काय असते? नुसतेच शरीराने वाढणे नव्हे,तर बुद्धीने,ज्ञानाने,मनाने वाढणे व विकसित होणे असते. त्यात कौतुक जरूर असते. माया,प्रेम,शुभेच्छा असतात.आशीर्वाद असतात आणि समाजाचे अंग बनलेल्या त्या विशिष्ट व्यक्तीला त्याच्या जन्माचे मोल बाकीच्यांना किती आहे हे जाणीवपूर्वक सांगणे असते.
असा प्रकार सर्वच कार्यकर्त्याकडून सर्वच राजकिय पक्षात आपल्या नेत्यांविषयी असतो. कारण तो आपल्या नेत्यावर असलेल्या निस्सीम प्रेमाचा एक निर्मळ भाग समजला जातो.मात्र,या माजी आमदार असलेल्या गणमान्य व्यक्तीचे वाढदिवसाचे स्टेटस कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईलवर ठेवल्याने याची ऍलर्जी पक्षाच्याच एका स्वनामधन्य नेत्याला झाल्याची जोरदार चर्चा त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यासह जिल्ह्यातील एका विधानसभा क्षेत्रातील जनतेमध्ये दिसून येत आहे.
हेही वाचा । जागावाटप : बिघडलयं ? छे.. छे.. महायुतीचं आता ठरलंय !
हे स्वनामधन्य नेमके नेते कोण? माजी आमदारांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे स्टेटस कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईलवरुन काढून टाकावे असे फर्मान सोडणाऱ्या या नेत्याला या माजी आमदारांच्या वाढदिवसाची ऍलर्जी का झाली असावी ? असा प्रश्न पक्षातील कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील विविध पक्षातील नेत्यांनाही पडू लागला आहे.
कदाचित आगामी विधानसभेत पक्षाकडून उमेदवारी मिळणे कठिण जावू शकते म्हणून तर हा अट्टाहास या स्वनामधन्य नेत्याकडून केला गेला तर नसावा ना ? किंबहूना माजी आमदार महोदयांना पक्षाकडून उमेदवारी मिळू नये म्हणून या स्वनामधन्य नेत्याने कटप्पा बनून कार्यकर्त्यांना स्टेटस काढून टाकण्याचे फर्मान तर सोडले नसावे ना ? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
पक्षातील आपल्याच नेत्याच्याच विरोधात असे फर्मान पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोडणारे असे जर पक्षात असतील तर, पक्षासाठी कोणते दिवे लावणार? आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणता संदेश घेऊन जाणार ? ज्यांनी संपूर्ण हयात पक्षात आणि संघात घालवली किंबहुना घालवित आहेत,ते मोठे की? नव्याने आलेले,अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊन स्वतःला स्वनामधन्य समजणारे मोठे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केल्या जात आहे.
‘त्या’ नेत्याबद्दल नाराजीचे सूर
जिल्ह्यातील तीन पैकी एका विधानसभेतील एका पक्षाचे माजी आमदार असलेल्या एका विकासपुरुषाचा जन्मदिवस त्यांच्या चाहत्या वर्गाकडून तसेच कार्यकर्त्यांकडून नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जन्मदिनाचे औचित्य साधून शेकडो कार्यकर्त्यांनी व्हाट्सअप स्टेट्स ठेवले.
दरम्यान,पक्षातीलच एका स्वयंघोषित स्वनामधन्य नेत्याने कार्यकर्त्यांना आवाहन करीत व्हाट्सअप वरील स्टेट्स हटविण्याचे सांगितले. या प्रकारामुळे विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली असून, नेमका हा नेता कोण? याची खमंग चर्चा जनमानसात रंगली आहे. तर,कार्यकर्त्यांमध्ये या नेत्याबद्दल नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

