>>>>>>भंडारा चौफेर | अतुल नागदेवे
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघासह साकोली विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या संभाव्य उमेदवारांमध्ये उमेदवारी आपल्यालाच मिळेल अशी जाहीर वल्गना होत असली तरी या घडीला त्यांच्या चेहऱ्यावरची माशी उडत नसून बोलण्यात सुद्धा दम दिसून येत नाही. यामुळे निवडणुकीची घटिका जवळ येताच माधुरी दीक्षितच्या बेटा चित्रपटातील “धक धक करने लगा” या गाण्याची परिस्थिती संभाव्य उमेदवारांमध्ये दिसून येत आहे.
हेही वाचा : राज्यात ५ वर्षांत, ३ सरकार…, २ पक्षांची ४ शकले
राज्यात विधानसभेचा कार्यकाल २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत असून, मागील पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान २१ ऑक्टोंबर २०१९ तर निकाल २४ ऑक्टोबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आला होता. राज्यात आचारसंहिता लागू झाली असून, येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान बजावल्या जाणार आहे.
हेही वाचा : भाऊ, लाइनीत लय हाय, विधानसभेची तिकीट कोणाले भेटन गा ?
सध्या महायुतीही सर्वकाही आलबेल आहे असं नाही. सुरुवातीला सरळ आणि सोपी वाटणारी विधानसभेची निवडणूक आता प्रत्येक घटक पक्षालाही कठीण होत चालली आहे. सरळ-सरळ भाजप आणि आघाडीमध्ये निवडणूक होईल असा विचार मतदार संघातील प्रत्येक मतदार व नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा : विदर्भावर झेंडा म्हणजे राज्यात सत्ता !
दरम्यान, घडत असलेल्या घडामोडी आणि घटनाक्रमावरून महायुतीमधून आता ही जागा कुठल्या पक्षाला जाईल अजूनही निश्चित कुणीच सांगायला तयार नाही. तर भाजपकडून डॉ. सोमदत्त करंजेकर, ऍड. प्रकाश बाळबुधे, डॉ. विजया (ठाकरे) नंदुरकर, राजेश (बाळा) काशिवार यांची नावे चर्चेत आहेत.तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अविनाश ब्राम्हणकर यांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे.

