>>>>>>शमीम आकबानी | भंडारा चौफेर
भंडारा | कामगार कल्याण मंडळा तर्फे साहित्य वाटप प्रक्रियेत कामगारांना होणारा त्रास लक्षात घेता प्रत्येक तालुकास्तरावर कामगार नोंदणी व साहित्याचे वाटप करण्यात यावे अशी मागणी भाजपा जिल्हा सचिव डॉ. विजया (ठाकरे) नंदुरकर यांनी केले आहे. कामगार कल्याण मंडळा तर्फे भंडारा जिल्ह्यायात नोंदणीकृत कामगारांना मागील दहा दिवसांपासून किट व संसार उपयोगी साहित्याचे वाटप केले जात आहेत.
साहित्य घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील कामगार महीला व पुरुष वर्ग भंडारा येथे येत आहेत. सध्या सुरू असलेल्या वाटप केंद्रावर रात्री ११ वाजेपासून कामगार तळ ठोकून उपाशी बसतातसाहित्य वाटप केंद्रावर खाण्यापिण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने येथे कामगारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
आठ दिवसापूर्वी भंडारा शहारातील अखिल सभागृह येथिल साहित्य वाटप केंद्रावर चेंगराचेंगरी होवून काही महीला कामगार जखमी झाल्या होत्या पाच ते सहा महीलाना सामान्य जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
ही गर्दी आटोक्यात येत नसल्याने पोलिसांनी कामगारांवर सौम्य लाठीहल्ला केला. अशा घटना व कामगाराचे होणारे हाल टाळण्यासाठी कामगार नोंदणी व साहित्य वाटप प्रत्येक तालुकास्तरावर वाटप सुरू करण्यात यावे अशी मागणी भाजपा जिल्हा सचिव डॉ. विजया नंदुरकर यांनी केली आहे.

