>>>>>>भंडारा चौफेर | गोंदिया प्रतिनिधी
गोंदियाचे तत्कालीन भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्यावर पक्षाने केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्राद्वारे निलंबन त्वरित मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यांच्यासोबतच निलंबित करण्यात आलेल्या गोंदिया जिल्ह्यातील बारा स्थानिक भाजपा पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींवरचेही निलंबन रद्द केले आहे.
सण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी तसेच पक्षविरोधी कार्यवाही केल्यावरून अग्रवाल यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांचे पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आले होते. आता त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई मागे घेत असल्याचे प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी जाहीर केले आहे.
त्यांच्यासोबत भाऊराव उके, छत्रपाल तुरकर, डॉ. अमित बुद्धे, मुनेश रहागंडळे, रामराजे रवरे, शिव शर्मा, धन:श्याम पानतवने, धर्मेश अगरवाल, दीपक बोबडे, नीतू बिरिया, शैलेश सोनावणे, कमलेश ढिलारे यांचेही निलंबन मागे घेवून बावनकुळे यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

