>>>> भंडारा चौफेर | प्रतिनिधी
सन २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपच्या माजीमंत्री, आमदार पंकजा मुंडे यांनी राज्यव्यापी संघर्षयात्रा काढली होती. त्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आली, त्यात या यात्रेचाही वाटा होता. सरकार स्थापन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. त्याच्या दहा वर्षांनंतर मात्र त्यांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी ‘शिवशक्ती परिक्रमा’ ही यात्रा काढावी लागली.
हेही वाचा : सिंदीपार ग्रामस्थांनी केली राजकिय नेत्यांना गावबंदी
एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते होते. २०१४ मध्ये भाजपची सत्ता आली आणि मुख्यमंत्रिपदाची त्यांची महत्त्वाकांक्षा जागी झाली. त्यांना ते पद मिळाले नाही. कैबी नेट मंत्रिपद मिळाले, मात्र त्यांना लवकरच राजीनामा द्यावा लागला. त्यावेळेपासून खडसे यांचाही राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे, या संघर्षातूनच ते राष्ट्रवादीत गेले.
हेही वाचा : नाना जब भी बिखरा है, दुगनी रफ्तार से……..वाचा!
आता ते पुन्हा भाजपचे दार ठोठावताहेत. मात्र, काही केल्या कड़ी उघडत नसल्याने ते पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत आहेत. पंकजा मुंढे, एकनाथ खडसे यांच्यानंतर शिवसेनेचे (ठाकरे गट) काही नेते उद्धव ठाकरे यांनाही या रांगेत आणण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कॅबिनेट मंत्री असताना आणि त्याच्या नंतरही आतापर्यंत पंकजा मुंडे गांना संघर्षच करावा लागतआहे. त्याचे कारण म्हटले फार छोटे आणि मोठेही आहे. एकनाथ खडसे यांनाही तेच कारण लागू होते.
हेही वाचा : जन पळभर म्हणतील हाय हाय, कार्यकर्तेच नाही राहिले तर नेता करील काय ?
पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री व्हायचे हीत आणि आता उद्धव ठाकरे यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे.या तिघांत फरक इतकाच आहे की पंकजा मुंडे आणि खडसे बांनी स्वतः इच्छा व्यक्त केली होती. मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे उद्धव ठाकरे स्वतः म्हणत नाहीत, कॅबिनेट मंत्री असताना पंकजा मुंडे एकदा म्हणाल्या होत्या, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. त्यावेळेसपासून त्यांच्या मागे संकटांचा फेरा लागला किंवा संकटांचा फेरा लावण्यात आला, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
पंकजा मुंडे या महिला व बालविकासमंत्री होत्या. त्यांच्या खात्यात चिक्की पोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले. सध्या कॅबिनेट मंत्री असलेले त्यांचे चुलतबंधू धनंजय मुंडे त्यावेळी विरोधी पक्षनेते होते, त्यांनी हे प्रकरण लावून धरले होते. पंकजा मुंडे यांच्या खात्याशी संबंधित या कथित घोटाळ्याची कागदपत्रे धनंजय मुंडे यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील याची सोय लावून देण्यात आली होती. ती कुणी लावली होती, हेही फार काळ लपून राहिले नाही.
हेही वाचा : सध्याच्या राजकारणात विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर… अन सच्चे कार्यकर्ते उष्ट्या वाटीवर
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बंधू धनंजय मुंडे सोचत असूनही पंकजा यांचा पराभव झाला. दरम्यानच्या काळात राज्यातील राजकीय, सामाजिक समीकरणे बदलली आणि पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली. नाथाभाऊ, म्हणजे एकनाथ खडसे यांनी स्वतःला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे संबोधले होते. त्यांनाही त्याची पुरेपूर किंमत चुकवावी लागली. घोटाळ्यांचे आरोप झाल्याने त्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लागला. त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या कुटुंबीयांवरही गुन्हे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचे संकेत दिले दिल्लीत जाऊन नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, त्यांच्या प्रवेशाला भाजपमधून विरोध सुरू झाला. परिणामी, नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा लांबणीवर पडली. यामुळे त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाचे संकेत दिले, मात्र आता त्या पक्षातूनही त्यांच्या विरोधात सूर उमटू लागले आहेत.

