>>>>>संदीप नंदनवार | भंडारा चौफेर
विधानसभा निवडणुकीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात विविध लोकप्रिय योजनांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीकडून केला जात आहे.
हेही वाचा : कामे करण्याची धमक फक्त महायुतीच्या नेत्यांमध्येच : अजित पवार
लाडक्या बहिणीच्या सर्वांगीण विकासाकरिता व सक्षमीकरणाकरिता निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच तुमसर -मोहाडी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाकरिता आता पर्यंत तीन हजार कोटींचा निधी दिला आहे. आगामी काळात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता पाच हजार कोटींच्या निधी देऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुमसर येथील आयोजित न सन्मान यात्रेत उपस्थितांना देत आश्वासनांचा पडला पाऊस पाडला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जन सन्मान यात्रा तुमसर येथे शनिवारी (दि.२८)नेहरू क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर खा. प्रफुल्ल पटेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, आ. राजू कारेमोरे, आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुधे उपस्थित होते. या कार्यक्रमाला ५० हजार महिला पुरुषांनी हजेरी लावली होती.
हेही वाचा : अमित शहांनी दिला विजयाचा कानमंत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तुमसर येथे सकाळी ११.३० वाजता हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर त्यांची शहरातून रॅली काढण्यात आली. एस एन मोर कॉलेज, जुना बस स्थानक ,नवीन बसस्थानक, विनोबा भावे बायपास मार्ग या चौकात अजित पवार यांच्यांवर जेसीबीच्या मदतीने फुलांच्या वर्षाव करत जंगी स्वागत करण्यात आला.
हेही वाचा : जनतेच्या मनातल्या ‘CM’ चा अस्तित्वासाठी संघर्ष
तांबी चौक, बावनकर चौक, सुभाष चौकात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर नेहरू शाळेजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभास्थळी ते दाखल झाले. सभेत दाखल होताच उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार राजु कारेमोरे, खा. प्रफुल्ल पटेल यांच्या हाताला उपस्थित महिलांनी राख्या बांधल्या.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, लोक कल्याणकारी योजनेमुळे विरोधकांच्या पोटाला चिमटा लागला आहे. लाडक्या बहिणी सबळ होतील त्याकरिता अर्ज देण्याची मुदत ३० तारखेपर्यंत वाढविली आहे. त्यांना एकाच वेळेस ४५०० रुपये मिळतील. शासन आर्थिक स्वावलंबी योजनेत वर्षाला १८ हजार रुपये देणार आहे.
काँगेस वालांच्या मनात मळमळ आली आहे ते योजना चालू देणार नाही असे म्हणतात. लाडकी बहीण योजनेकरिता ४६ हजार कोटी रुपये दिले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित महिलांना लाडक्या बहिणीचा निधी मिळाला काय अशी विचारणा केली तेव्हा महिलांनी होय निधी मिळाला असे उत्तर दिले.
दरम्यान, जन सम्मान यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून व येथील तब्बल पन्नास हजारांच्या घरात असलेल्या नागरीकांच्या गर्दी हाताळता यावी, याकरीता संपूर्ण जिल्ह्यातील शेकडो पोलिस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा फौज फाटा तैनात होता.
‘तुमचा खासदार ‘बाबाजीचा ठेंगा’ देणार’ : प्रफुल पटेल
भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमात खासदार प्रफुल पटेल गरजले. खा. पटेल यांनी विरोधकांवर निशाना साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच महाविकास आघाडीचा खासदार तुमच्यासाठी काही करणार नाही,
‘बाबाजीचा ठेंगा‘ देणार, असे सांगून आपला संताप व्यक्त केला .खा. पटेल म्हणाले, मी जेव्हा 1991 मध्ये निवडून आलो होतो, तेव्हा बावनथडी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची मतदारांची मागणी होती. ती पूर्ण करण्यात आली. हे करताना जातीपातीचे राजकारण केले नाही.
हेही वाचा : सिंदीपार ग्रामस्थांनी केली राजकिय नेत्यांना गावबंदी
सर्वांना सोबत घेऊन चाललो. आजही जिल्ह्यातील विकासाचे कामे कोणी केली, अशी विचारणा केल्यास भाईजी असेच उत्तर दिले जाते. मात्र, आगामी विधानसभेत लोकसभेसारखी दिशाभूल होऊ देऊ नका. काम करणाऱ्या माणसाची ओळख ठेवा. या मतदारसंघात मोठा उद्योग आणू. असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.
आमदार कारेमोरेंची उमेदवारी पक्की?
नेहरु मैदानांवरील आयोजित जनसम्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित नागरिकांना संबोधित करीत असताना चक्क मंचावर उपस्थित असलेले आमदार राजु कारेमोरेंना हाक देत आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार कारेमोरेंना मदत करावी व त्यांच्या बाजुने भक्कम पणे उभे रहावे, असे आवाहन केले.
त्यावेळी आमदार कारेमोरे मंचावर उभे राहून उपस्थितांना नमस्कार करीत आशिर्वाद घेतला. त्यामुळे येथे आमदार राजू कारेमोरेची तुमसर-मोहाडी विधानसभेत उमेदवारी निश्चित मानली जात आहे.परिणामी येथे विरोधकांच्या गटात खळबळ उडाली आहे.

