>>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
साकोली विधानसभा मतदार क्षेत्रात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. या क्षेत्रातून उच्चशिक्षित अपक्ष उमेदवार डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी प्रचाराला शेवटच्या दिवशी वेग आणला आहे. डॉ.सोमदत्त करंजेकर हे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करत आहेत. त्यांच्या प्रचाराची मुख्य घोषणा म्हणजे ‘लोकशाहीसाठी नवा आवाज’ डॉ.सोमदत्त करंजेकर यांनी स्थानिक प्रश्नांवर भर देत विकास, रोजगार,आणि शेती यासंदर्भात महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित करत आहेत.
स्थानिक विधानसभा क्षेत्र रोजगार व औद्योगिक विकासात मागे पडला आहे.त्यांच्या मते, सत्ताधाऱ्यांकडून क्षेत्राच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले असून, ते नवी दिशा देऊ इच्छित आहेत. डॉ.करंजेकर यांनी स्थानिक पातळीवरील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे समर्थक बदल घडवू शकतात, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
साकोली विधानसभा क्षेत्रातील ही निवडणूक खूपच चुरशीची होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचे परिणाम हे या क्षेत्राच्या भविष्यासाठी निर्णायक ठरतील.मात्र भविष्यातील राजकारणासाठी डॉ. सोमदत्त करंजेकर आश्वासक चेहरा ठरणार आहे. तरुण, उच्चशिक्षित उमेदवार असल्याने व साकोली विधानसभा क्षेत्राच्या समग्र विकासाची दुरदृष्टी असल्याने तरुणाई मोठया संख्येने डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्या पाठीशी असल्याचे चित्र दिसत आहे.