चौफेर क्राईम वार्ता लाखनी | स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घरी कुणी नसल्याची संधी साधून ५० वर्षीय वयस्क नराधमाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना (१ऑक्टोंबर) रोजी सकाळी ११:३०वाजताच्या सुमारास घडली. मयपाल मंगर हटवार अंदाजे (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे.
या घटनेतील पिडीत अल्पवयीन मुलगी ही घरी एकटीच होती.दरम्यान या संधीचा फायदा घेत,आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरात शिरकाव करून मला तुज्याशी बोलायचं आहे असे बोलून पिडीतेची छेड केली.या घटनेतील आरोपीला मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना देखील या ५०वर्षीय वयस्क आरोपीने पिडित मुलीच्या घरातच तिचा विनयभंग केला.
तसेच याबाबतची माहिती कुणाला सांगल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या अकस्मात घडलेल्या घटनेमुळे अल्पवयीन मुलीला खूप मानसिक धक्का बसला आहे. घडलेल्या प्रकाराची तक्रार तिने लाखनी पोलीसांत दिली आहे.
पिडीत अल्पवयीन मुलीच्या तोंडी तक्रारीवरून आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ कायदयाअंतर्गत कलम ७४,३३३,३५१ (२)भारतीय न्याय संहिता सहकलम ८पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आशिष चिलांगे करीत आहेत.