ऑनलाईन चौफेर लाखनी | राज्यात सध्या विधानसभेची रणधुमाळी सूरू असून, साकोली विधानसभेतील लाखनी तालुक्यात शेकडो, भाजप कार्यकर्त्यांनी एन, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वावार विश्वास ठेवून भाजपला सोडचिट्टी दिली आहे.
देशातील आणि राज्यातील भाजपा सरकारकडून जनतेचाच नव्हे तर त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांचेही अपेक्षाभंग झाल्याचे चित्र साकोली विधानसभेत दिसत आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची धमक या सरकारमध्ये नाही. वर्षभरातच या सरकारने राज्याचा विश्वासघात केला आहे.
त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची साकोली विधानसभेतील लाखनीपासून सुरवात झाली आहे. असे मत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. शफी लंद्दानी यांनी व्यक्त केले.
लाखनी येथील कच्ची मेमन हॉल सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश मेळाव्यात भाजपाचे कार्यकर्ते टिकेश्वर दोनोडे, ज्ञानेश्वर दोनोडे, नंदकिशोर जवंजार, प्रताप किरणापुरे, गणेश दोनोडे, विश्वजीत सोनटक्के, विकास भेदे, राधेश्याम लांजेवार, अश्विन हजारे, राकेश मेश्राम, बाळा हजारे, छोटू मने, राहुल दोनोडे, यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

