>>> भंडारा चौफेर | प्रतिनिधी
Milk union election भंडारा : जिल्हा दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले Nana Patole आणि शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी हातमिळवणी करीत दूध संघाच्या (Milk union election) निवडणुकीत एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनपेक्षित युतीने जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडवली असून, यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी
नाना पटोले यांनी या युतीमागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले, भंडारा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि दूध संघाला पूर्वीचे वैभव परत मिळवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ही युती राजकीय स्वार्थासाठी नसून, सहकार क्षेत्रातील गैरव्यवस्थापना विरुद्धचा लढा आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, या निवडणुकीनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीही स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.
नरेंद्र भोंडेकर यांनीही या युतीला पूर्ण पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले, “भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्र गेल्या काही वर्षांत ढासळले आहे. दूध संघाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आमचा उद्देश या निवडणुकीद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि दूध संघाला नव्याने उभारी देणे आहे. त्यांनी या युतीला राजकीय रंग न देता, ती केवळ शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असल्याचे अधोरेखित केले.
निवडणुकीकडे लागले लक्ष
जिल्ह्यातील दूध संघ निवडणूक (Milk union election) आता राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून चर्चेचा विषय बनले आहे. दोन दिग्गज नेत्यांच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे सहकार क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही युती केवळ दूध संघापुरती मर्यादित राहणार की भविष्यातील स्थानिक निवडणुकांमध्येही कायम राहणार? याबाबत उत्सुकता आहे.
ही युती जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला नवे दिशादर्शन देणार अशी आशा व्यक्त केली जात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव आणि सुविधा मिळाव्यात, यासाठी या निवडणुकीतून सक्षम नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे. येत्या काळात युतीचे परिणाम काय होतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.