>>>>>>भंडारा चौफेर | प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. जागावाटपावरून तिढा निर्माण होणार हे निश्चित आहे, कारण एकापेक्षा अधिक पक्ष एकत्र आले की वाद होतात, तिढा निर्माण होतच असतो. लोकसभा निवडणुकीत १३ जागा जिंकत काँग्रेस राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनला. त्यामुळे नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
हेही वाचा : साकोली विधानसभा: राष्ट्रवादी काँग्रेसची ‘सन्मान यात्रा’ देणार नानांना शह?
या वाढलेल्या आत्मविश्वासातूनच काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. मुख्यमंत्रिपद सर्वच पक्षांना हवे असते, तसे ते महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना हवे आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी या मुद्द्यावर फार जोर दिलेला दिसत नाही. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट मात्र आक्रमक झाले आहेत. त्यातून या तिन्ही पक्षांत आताच ‘झापुकझुपुक’ सुरू झाली आहे.
हेही वाचा : कुठे नेऊन ठेवला नेत्यांनी भाजप ?
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, यासाठी आधी उद्धव ठाकरे अडून बसले होते. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ही मागणी मान्य केली नाही. मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा जाहीर करा, आपला त्याला पाठिंवा राहील, अशी मागणीही नंतर ठाकरे यांनी केली होती.
मात्र, तीही मान्य करण्यात आली नाही. त्यातून या तिन्ही पक्षांत आताच धुसफूस सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, यासाठी आधी उद्धव अडून बसले होते. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ही मागणी मान्य केली नाही. मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा जाहीर करा, आपला त्याला पाठिंबा राहील, अशी मागणीही नंतर ठाकरे यांनी केली होती, मात्र, ती ही मान्य करण्यात आली नाही.
हेही वाचा : गावकारभाऱ्यांचे मानधन अन् रुबाबही वाढला : शासनाचा बळ देणारा निर्णय
उद्धव आणि त्यांच्या नेत्यांची मागणी फेटाळताना महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी संख्याबळानुसार मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका घेतली होती. असे असतानाही आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल, असा दावा केला आहे. उद्धव यांच्या मागणीसाठी लावलेला न्याय चव्हाण यांनी काँग्रेसलाही लागू करायला हवा.मुख्यमंत्री संख्याबळानुसारच ठरणार, असा निर्णय झाला असेल तर मग काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार, असा दावा जागावाटप पूर्ण झालेले नसतानाही करण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या काही वर्षापासून निवडणूक ही चेहऱ्यावर लढली जाऊ लागली आहे, म्हणजे निवडणुकीच्या आधीच पंतप्रधानपद, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करायचा आणि मग निवडणुकीला सामोरे जायचे. निवडून आलेल्या खासदार आणि आमदारांनी आपल्यातूनच एकाची पंतप्रधान, मुख्यमंत्रिपदी निवड करायची असते. राज्यातील दोन महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष फुटून भाजपसोबत गेले होते.
हा प्रकार लोकांना आवडलेला नव्हता. महाविकास आघाडी सरकार पडले आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्याच्या वर्षभरानंतर अजितदादा पवार यांनी काका शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत जाणे पसंत केले. यामुळे उद्धव आणि पवार यांना प्रचंड सहानुभूती मिळाली आणि महायुतीवर लोकांचा राग वाढला. याचा फायदा महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत झाला.
हेही वाचा : भावी उमेदवारांनी घेतला ‘लिफाफा सर्व्हे’ चा धसका?
काँग्रेस सर्वात मोठा लाभार्थी ठरला, तो विविध टापूंमध्ये तरुण नेत्यांनी निर्माण केलेल्या त्यांच्या प्रभावामुळे. खरेतर उद्धव ठाकरे यांच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, असे वाटत होते. मात्र, काही गणिते चुकल्यामुळे आणि काही ठिकाणी गाफील राहिल्यामुळे उद्धव यांचे ९ खासदार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दहा जागा लढवत आठ जिंकल्या आणि स्ट्राइक रेटच्या हिशेवाने राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरला.
आपलेच जास्त आमदार निवडून यावेत आणि मित्रपक्षाचे कमी यावेत, अशी भावनाही या पक्षांमध्ये निर्माण होऊ शकते. महायुतीशी लढत असतानाच महाविकास आघाडीला अंतर्विरोधांचाही सामना करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे तिन्ही पक्षांत निर्माण झालेला उत्साह महाविकास आघाडीसाठी घातक तर ठरणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे