चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: योजनेच्या लाभासाठी पिंपळगावच्या सरपंच बनल्या आजीबाई
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > ताज्या बातम्या > योजनेच्या लाभासाठी पिंपळगावच्या सरपंच बनल्या आजीबाई
ताज्या बातम्या

योजनेच्या लाभासाठी पिंपळगावच्या सरपंच बनल्या आजीबाई

वय ४९ केले ७१ चुकीची जन्मतारीख नोंदवून बनविले बोगस आधार कार्ड

चौफेर वार्ता
Last updated: September 22, 2024 9:54 am
चौफेर वार्ता
Share
फोटो : गुगल
SHARE

भंडारा चौफेर | शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. सरपंचांनी वृद्धापकाळ योजनेच्या लाभ घेण्यासाठी चक्क बनावट आधार कार्ड तयार केले. तिथे चुकीची जन्मतारीख लिहून त्या सात ते आठ वर्षांपासून वृद्धापकाळ योजनेच्या लाभ घेत आहेत. हा प्रकार पिंपळगाव / कान्हळगाव येथील सरपंच रेखा ज्ञानेश्वर गभणे यांनी केला आहे.

हेही वाचा : साकोली विधानसभा : महायुतीचा उमेदवार कोण? जोरदार रस्सीखेच

पिंपळगाव/कान्हळगाव येथील सरपंच रेखा गभणे यांनी आठ वर्षांपूर्वी वृद्धापकाळ योजनेच्या लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रावरून बनावट आधार कार्ड तयार केले. त्यांनी ३७५८ ५०१२ २७२७ या नंबरचे दोन आधार कार्ड तयार केले आहेत. एका कार्डवर १० नोव्हेंबर १९७५ तर, दुसन्या आधार कार्डवर १ जानेवारी १९५३ अशा दोन जन्मतारखा आहेत. त्यापैकी दुसरे आधार कार्ड वापरून वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेण्यात आला आहे. या आधार कार्डवर असलेली जन्मतारीखेनुसार आज सरपंच रेखा गभणे यांचे वय ७१ वर्षे आहे.

हेही वाचा : आमचे ठरले!भंडारा पवनी विधानसभा आता आमची

रेखा ज्ञानेश्वर गभणे ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या होत्या. त्यावेळी त्यांनी सरपंच पदाचे ऑनलाइन नामनिर्देशन दाखल केले होते. नामनिर्देशन पत्र दाखल करताना शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर असलेल्या प्रमाणेच ऑनलाइन अर्जातही १० नोव्हेंबर १९७५ ही जन्मतारीख लिहिलेली आहे. रेखा गभणे यांचे माहेर भंडारा तालुक्यातील सिरसी या गावचे आहे. त्यांच्या शाळेच्या रिकॉर्डवर १० नोव्हेंबर १९७५ ही जन्मतारीख आहे.

आता तहसीलदारांनी वृद्धापकाळ योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी तालुक्यात मोहीम सुरू केली. लाभार्थ्यांकडून वयाचे पुरावे जमा करण्यात आले. त्या पुराव्यात सरपंच रेखा गभणे यांनी वय वाढवून बनविलेला आधार कार्ड तलाठ्यांकडे जमा केले आहे.

हेही वाचा : विदर्भात भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता ?

मात्र, सरपंच रेखा गभणे यांचे वृद्धापकाळ योजनेतील मानधन आजही त्यांच्या बैंक खाता जमा होत आहे. त्यांनी निवडणूक लढण्यासाठी टीसीचा आधार घेतला गेला.वृद्धापकाळाचा लाभ घेण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर केला आहे. आता त्यांच्यावर कोणती कारवाई होते, याकडे गावकरी लक्ष देऊन आहेत.

फसवणूक करून दीड लाख घेतले

मागील आठ वर्षांपासून पिंपळगाव / कां येथील सरपंच असलेल्या रेखा ज्ञानेश्वर गभणे आंधळगाव येथील बँकेत वृद्धापकाळ योजनेचा लाभ महिन्याला दीड हजार रुपये जमा होत आहे. म्हणजे त्यांनी आतापर्यंत दीड लाख रुपये शासनाची दिशा व फसवणूक करून अनुदान घेतले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरणाची तक्रार

बोगस आधार कार्डच्या आधारे जन्मतारखेत बदल करून २२ वर्षे वय वाढवले. त्यावरून वृद्धापकाळ योजनेच्या लाभ घेण्यात आला. याची तक्रार जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना उपसरपंच उमेश उपरकर, ग्रामपंचायत सदस्य विजय चोपकर, बिरजलाल गभणे यांनी केली आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या सरपंचांवर फौजदारी कारवाई करावी. तसेच त्यांना सरपंच पदावरून कमी करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article साकोली विधानसभा : महायुतीचा उमेदवार कोण? जोरदार रस्सीखेच
Next Article वेध विधानसभेचे : जिल्ह्यात महायुतीसाठी विषय लई हार्ड हाय ए ?
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account