चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: रेती माफियांना महसूल कर्मचाऱ्यांचा ‘आशीर्वाद’?
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > चौफेर वार्ता > रेती माफियांना महसूल कर्मचाऱ्यांचा ‘आशीर्वाद’?
चौफेर वार्ता

रेती माफियांना महसूल कर्मचाऱ्यांचा ‘आशीर्वाद’?

घरकुल लाभार्थ्यांच्या रेतीवर, माफियांचा डल्ला

चौफेर वार्ता
Last updated: May 9, 2026 11:48 pm
चौफेर वार्ता
Share
File photo
SHARE

>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर

गरिबांना हक्काचे घर मिळावे या उदात्त हेतूने शासन घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देत आहे. घरकुल धारकांसाठी असलेल्या शासनाच्या सवलतीचा फायदा रेती माफिया उचलत असल्याचे वास्तव समोर आले आहे. एकाच परवान्यावर अनेकवेळा रेतीचा उपसा करून चढ्या दराने विक्री केली जात असून, या प्रकाराकडे महसूल विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. त्यामुळे रेती माफियांना महसूल कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद आहे की काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.पळसगाव रेती घाटावर महसूल कर्मचाऱ्यांनी घेतलेली संशयास्पद भूमिका व माफियांशी असलेले त्यांचे साटेलोटे तालुक्यात चर्चेचा विषय ठरत हे.

एका परवान्यावर अनेक फेऱ्या; लाभार्थ्यांची फसवणूक

लाखनी तालुक्यात रेती माफियांनी नवीन शक्कल लढविली आहे. सदर रेती माफिया घरकुल लाभार्थ्यांना परस्पर गाठतात व रेती मिळवून देण्याचे आमिष दाखवतात. लाभार्थ्यांच्या नावावर ५ ब्रास रेतीचा परवाना मिळवला जातो, मात्र प्रत्यक्षात त्याच एका परवान्यावर अनेक वेळा रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, लाभार्थ्यांच्या नावावर काढलेली रेती त्यांना न देता, रेती माफिया चढ्या भावाने दुसऱ्यांना विकून नफेखोरी करत आहेत.

पळसगाव घाटावर महसूलचे ‘झोपेचे सोंग’

तालुक्यातील पळसगाव येथील रेती घाट केवळ घरकुल लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. मात्र, या घाटावर असलेले महसूल कर्मचारी कर्तव्याऐवजी झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत की काय? डोळ्यादेखत परवान्यांचा गैरवापर होऊन रेतीची चोरी होत असताना कोणतीही कारवाई का केली जात नाही? ही चुप्पी नेमकी कोणासाठी? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

महसूल कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय

रेती माफिया आणि महसूल कर्मचारी यांच्यात छुपी हातमिळवणी असल्याची खमंग चर्चा आता लाखनी तालुक्यात रंगू लागली आहे. कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा होणे शक्य नसल्याचे नागरिक बोलत आहेत. या प्रकारामुळे गरजू लाभार्थ्यांना खरोखर घरासाठी रेतीची आवश्यकता आहे, त्यांना मात्र रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर तसेच रेती माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article साकोलीचा ऐतिहासिक तलाव घेणार मोकळा श्वास ; ४.१० कोटींचा निधी मंजूर
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account