चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: साकोली विधानसभा : भाजपा फ्रंटफुटवर तर काँग्रेस बॅकफुटवर?
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > ताज्या बातम्या > साकोली विधानसभा : भाजपा फ्रंटफुटवर तर काँग्रेस बॅकफुटवर?
ताज्या बातम्या

साकोली विधानसभा : भाजपा फ्रंटफुटवर तर काँग्रेस बॅकफुटवर?

चौफेर वार्ता
Last updated: September 29, 2024 1:00 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

>>>>>>भंडारा चौफेर | साकोली प्रतिनिधी

साकोली विधानसभा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून राजकीयदृष्टया चांगलाच चर्चेत आला आहे. या मतदारसंघात पक्ष नव्हे तर नेता आणि गट या भोवती राजकारण फिरते. यंदा लोकसभे अगोदर असलेले राजकीय वातावरण आता विधानसभेला राहिलेले नाही. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा साकोलीचे विद्यमान आमदार नाना पटोले यांच्या २५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत केलेल्या विकासकामांचा आढावा तर पाच वर्ष आमदार राहिलेल्या भाजपाच्या राजेश (बाळा) काशीवार यांच्या विकासकामांचा लेखाजोखा यावर मतदारसंघातील जनता मुल्यमापन करीत आहे. या विकासकामाच्या अनुषंगाने मतदारसंघात भाजपा फ्रंटफुटवर तर काँग्रेस बॅकफुटवर आल्याचे सर्वत्र चित्र दिसत आहे. 

गेल्या २५ वर्षांच्या राजकारणात आमदार नाना पटोले यांनी सामाजिक व विकास धोरणाच्या जोरावर सर्वसामान्य जनतेवर मजबूत राजकीय पकड निर्माण केली असल्याचा दावा २५-१५ व ३०-५४ च्या लाभार्थ्यांकडून  केला जात आहे. आमदार म्हणून काम करणाऱ्या नाना पटोले यांनी गेल्या २५ वर्षात साकोली मतदारसंघात जवळपास सर्वच गावांमध्ये विविध विकासकामे केली आहेत.

मात्र, वरील विकासकामांसोबतच आमदार पटोले यांच्या सामाजिक धोरणावर अधिक भर असल्याचे दिसून येत आहे . या धोरणांतर्गत समाजातील सर्व घटकांचा सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क असल्याने आमदार पटोले हे सर्वसामान्यांमध्ये अधिक प्रभावीपणे दिसून येत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नाना पटोले प्रचंड मतांनी विजयी होतील अशी अपेक्षा काँग्रेसला  आहे.

दरम्यान, साकोली विधानसभा मतदारसंघातून गेली ५ वर्षे भाजपचे आमदार असलेले बाळा काशीवार यांनी पटोले यांनी केलेल्या विविध विकासकामांची त्यांनी पाच वर्षात केलेल्या समाजपयोगी विविध विकासकामे सरस ठरवत चांगलीच चीरफाड केली आहे.  गेल्या २५ वर्षांच्या तुलनेत अवघ्या ५ वर्षांत सर्वाधिक विकासकामे झाल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे.

२५ वर्षांच्या तुलनेत अवघ्या ५ वर्षांत सर्वाधिक विकासकामे केल्याचा दावा करून बाळा काशीवार हेच नानांना शह देऊ शकतात, असे खुद्द काँग्रेसचे नेतेमंडळी दबक्या आवाजात बोलू लागले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अमुषंगाने २५ विरूध्द ५ असा नाना पटोले व  बाळा काशीवार यांच्या विकासकामांची तुलना मतदार करत असून कोण सरस व कोण निरस असे गावागावात चर्चाच्या फैरी झाडत गावनेते व ग्रामस्थ गप्पांचे फड रंगवीत आहेत.

विशेष म्हणजे माजी आमदार  काशिवार आपल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात सामाजिक धोरणाच्या निकषांनुसार राहिले व मतदारसंघातील प्रत्येक गावाची इत्यंभूत माहिती त्यांना आहे. त्यामुळे पराभवाच्या भीतीने धास्तावलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नानांसमोर भाजपाचे काशीवार उमेदवार नकोच म्हणून नरेटीव्ह सेट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून विविध उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यातील बाळा काशीवार हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात अधिक सक्रिय दिसत आहेत. त्याअंतर्गत माजी आमदार बाळा काशीवार हे गावागावात जाऊन थेट भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधत आहेत. 

आगामी निवडणुकीत भाजपाच्या कमळ चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदान करण्याची मागणी काशीवार करत आहेत. एकंदरीत बाळा काशीवार यांना भाजपाची उमेदवारी निश्चीत समजत भाजपाचे निष्ठावंत व संघनिष्ठ कार्यकर्ते एकप्रकारे मतदारसंघात भाजपाची पताका फडकविण्यास सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. 

दुसरीकडे सर्वसामान्यांमध्ये आमदार पटोले हे  अधिक आकर्षण असल्याने पटोले यांच्या विजयाचा दावा करणारे काँग्रेस नेतेमंडळी (अती) आत्मविश्वासात असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील अंतर्गत मतभेदामुळे काही अधिकारी व कार्यकर्त्यांनी घरी बसूनच निवडणूक विजयाचा दावा केल्याची चर्चा आहे.

मात्र, भाजपचे माजी आमदार बाळा काशिवार यांनी गेल्या काही दिवसांत प्रत्येक गावात अधिकारी व कार्यकर्त्यांशी केलेल्या जनसंपर्काला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे भाजपा फ्रंटफुटवर असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसजन घरी बसून निवडणुकीतील विजयाचा दावा करून बॅकफुटवर  चर्चा आहे.

चुकीचे धोरण महागात पडू शकते

आमदार नाना पटोले यांचा विधानसबा निवडणुकीत पराभव करायचा असे ठरवत गावागावात पोहोचणाऱे भाजपाचे कार्यकर्ते मतदारांनामध्ये जोश भरत आहेत. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत माविआने दलित मतदारांच्या मनात संविधाना विषयी नरेटीव्ह सेट करत मैदान मारले होते. 

मात्र, आता अडीच वर्षाच्या महायुतीच्या कार्यकाळात लोकोपयोगी विविध योजना घराघरात पोहचविण्याचे काम भाजपा करीत असल्याने यावेळी काँग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. याबाबत काँग्रेसजनांनी गाफील राहण्याचे धोरण सोडून सतर्क राहणे अत्यंत गरजेचे असल्याची चर्चा आहे.

बाळाभाऊंनी केलेली प्रमुख विकासकामे

मागील २५ वर्षांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले या भागाचे नेतृत्व करतात. परंतु, आ. पटोलेच्या २५ वर्षांच्या विकासकामांपेक्षा माजी आमदार बाळाभाऊ काशीवार यांनी त्यांच्या फक्त ५ वर्षांच्या कार्यकाळात  जास्त विकास कामे केली असल्याचा दावा केला आहे.

या विकासकामात माजी आमदार यांनी साकोली तालुक्यात २५० कोटी रूपयांचे एन.एच.आय. प्फॅायओव्हर , ७० कोटी रूपयांचे १०० बेडचे शासकीय रूग्णालय, १२ कोटी रूपयांचे आदिवासी मुलांचे-मुलींचे वसतीगृह, ६ कोटी रूपयांचे समाज कल्याण वसतीगृह, ५

कोटी रूपयांचे धान्य साठवणूक गोदाम (एफ.सी.आय.), ४ कोटी रूपयांचे तहसिल कार्यालय, ३ कोटी रूपयांचे पोलिस स्टेशन कार्यालय,  ३ कोटी रूपयांचे पंचायत समिती कार्यालय, ३ कोटी रूपयांचे क्रिडा संकूल तर लाखनी तालुक्यासाठी ३०० कोटी रूपयांचे एन.एच.आय.

प्फॅायओव्हर,  १८ कोटी रूपयांचे समाज कल्याण वसतीगृह, ५ कोटी रूपयांचे आय.टी.आय. ईमारत, ५ कोटी रूपयांचे धान्य साठवणूक गोदाम (एफ.सी.आय.),  ४ कोटी रूपयांचे  शासकीय रूग्णालय, ३ कोटी रूपयांचे क्रिडा संकूल, १.५  कोटी रूपयांचे जि. प. हायस्कूल बांधकाम, ६५ लक्ष रूपयांचे देवरी गोंदी तलाव नुतनीकरण, जी मागील २५ वर्षापासून मागणी होती, असे काशीवार यांनी सांगितले.

तसेच लाखांदूर तालुक्यात १५० कोटी रूपयांचा साकोली – लाखांदूर रस्ता (एन. एच. आय), मागील ४० वर्षांपासून मागणी असलेला १५० कोटी रूपयांचा ईटान, ईलम कोलारी पुल (सी.आर.एफ), २० कोटी रूपयांचा बोथली पुल व २० कोटी रुपयांचा चिचोली पुल या व्यतिरिक्त १८

कोटी रूपयांची लाखांदूर येथील प्रशासकी इमारत, १८ कोटी रूपयांचे धान्य साठवणूक गोदाम (एफ.सी.आय.), ४ कोटी रूपयांचे पंचायत समिती कार्यालय व ३ कोटी रूपयांचे पोलिस स्टेशन कार्यालय इत्यादी प्रमुख कामे केल्याचा दावा माजी आमदार बाळा काशीवार यांनी केला आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article दीपोत्सवानंतर लोकोत्सव ! मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे संकेत
Next Article गडेगाव येथून राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला सुरूवात
जिल्हा दूध-संघ निवडणुकीत टाय ; सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच
चौफेर वार्ता राजकारण
शिवसेना-भाजप वाद विकोपाला; फुके-भोंडेकर आमनेसामने
चौफेर वार्ता राजकारण
Milk union election : नाना पटोले-नरेंद्र भोंडेकर यांचा एकत्रित लढा
राजकारण विदर्भ
जिल्ह्यातील पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व कायम     
राजकारण विदर्भ
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account