विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. राजकीय कार्यकर्ते कामाला लागले आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचा उमेदवार निश्चित असल्याने कार्यकर्ते कामाला लागले. परंतु भाजपाच्या गोटात कमालीची शांतता व अंतर्गत धुसफुस सुरू आहे.
हेही वाचा : धक-धक करने लगा ! महायुतीच्या संभाव्य उमेदवारात भरली धडकी
साकोली विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. साकोलीची तिकीट भाजपाला मिळेल काय? याविषयी भाजपा कार्यकर्ते प्रश्न करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला साकोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराविषयी नाराजीचा सूर आहे.
हेही वाचा : राज्यात ५ वर्षांत, ३ सरकार…, २ पक्षांची ४ शकले
लाखनी येथे विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी भाजपा कार्यकर्त्याशी चर्चा केली. लाखनीच्या निवासस्थानी जवळपास पाचशेच्या वर कार्यकर्त्यांनी डॉ. फुके यांची भेट घेऊन राजकीय घडामोडींवर चर्चा केली आहे.
हेही वाचा : भाऊ, लाइनीत लय हाय, विधानसभेची तिकीट कोणाले भेटन गा ?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकोली विधानसभा क्षेत्राचे तिकीट निश्चित आहे.त्यामुळे त्यांना दमदारपणे लढत देणारा उमेदवार महायुतीला अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून पटोले यांचे नाव समोर आहे. असे असले तरी भाजप कार्यकर्ते आपल्या उमेदवारासाठी कंबर कसून तयार आहेत.
फुके यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
लाखनी भेटीदरम्यान आमदार डॉ. परिणय फुके भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यास साकोली विधानसभा क्षेत्राची तिकीट लढविणार असल्याचे सांगितले. महायुतीची तिकीट शेवटपर्यंत कोणाला मिळेल याविषयी सांगता येणार नसल्याचे डॉ. फुके यांनी सांगितले आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी सुसज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.

