चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: भावा, साकोली मतदारसंघात इच्छुकांचीच हवा…एका मतदारसंघात तीन तालुके असल्याने चढाओढ वाढली
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > राजकारण > भावा, साकोली मतदारसंघात इच्छुकांचीच हवा…एका मतदारसंघात तीन तालुके असल्याने चढाओढ वाढली
राजकारणविदर्भ

भावा, साकोली मतदारसंघात इच्छुकांचीच हवा…एका मतदारसंघात तीन तालुके असल्याने चढाओढ वाढली

चौफेर वार्ता
Last updated: September 30, 2024 11:52 am
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

>>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी

साकोली विधानसभा मतदारसंघ – ६२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, साकोली मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका, लाखनी तालुका व लाखांदूर तालुका, अशा तीन तालुक्यांचा मिळून एक साकोली मतदारसंघ आहे. तीन तालुके असल्यामुळे काँग्रेस वगळता महायुतीतील घटक राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी आपापल्या पक्षातर्फे तिकीट मिळविण्यासाठी मेळावे व बैठकांद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन दाखवणे सुरू केले आहे.

सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गावभेटी आणि जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच महायुतीत साकोली विधानसभा मतदार संघाच्या जागेवरून साकोली विधानसभा मतदारसंघामधील जनतेमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

साकोली विधानसभेत ज्यांची निवडून यायची क्षमता तोच उमेदवार, असे म्हणत निष्ठावंत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी साकोली विधानसभेची भाजपाची उमेदवारी माजी आमदार बाळा काशीवार यांनाच मिळावी म्हणून आपला दावा केला आहे. भाजपाचे माजी आमदार बाळा काशीवार यांनी साकोलीमधून जनसंवाद दौरा करत, जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपल्या पक्षाची ताकत दाखवत आहेत.

सोबत सामाजिक व शैक्षणिक कार्यातून भाजपा कार्यकर्ता सोमदत्त करंजेकर व माजी जि. प. अध्यक्ष लाखांदूरचे ऍड. वसंत एंचिलवार यांनी तर गावागावात गाठीभेटीवर जोर देत चांगलाच जनसंपर्क वाढविला आहे.

मात्र, आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या मतदार संघावर दावा करण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अविनाश ब्राम्हणकर यांनी देखील परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून गावागावात गाठीभेटीवर जोर देत मतदारांसोबत जनसंपर्क करण्यावर भर दिला आहे.

महायुतीचे इच्छुक उमेदवार डॉ. विजया ठाकरे (नंदूरकर) ह्या भंडारा विधानसभा मतदारसंघातील पवनी तालुक्यातील असून त्यांनी देखील महायुतीमधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने साकोली विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या देखील मतदारसंघामध्ये गावागावात दौरे करत असल्यामुळे साकोली विधानसभेतील मतदारसंघातील जनतेमध्ये अनेक राजकीय चर्चा जोर धरत आहे. तर दुसऱ्या बाजूला साकोली विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे आमदार नाना पटोले हे एकदा भाजपा कडून तर एकदा काँग्रेस कडून एकदा असे दोन वेळा निवडून आलेत आहेत.

सेनासेना भी तैयार है और सेनापती भी तैयार है! म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांकडूनही पटोले यांच्या एकहाती विजयाचा दावा केला जात आहे. असे असले तरी काँग्रेसच्या कंपूत नेत्यांच्या नावाचा आसूरी ‘आनंद’ घेत आयत्या बिळावर नागोबा होणारे ‘दूत’ म्हणजेच चहा पेक्षा केटली गरम प्रवृत्तीचे लोकच नानांना निवडणुकी काळात अडचणीत आणू शकतात, असेही नाव न जाहिर करण्याच्या अटीवर काँग्रेसच्या नेत्य़ांनी सांगितले आहे.

एकंदरीत जो तो पक्ष आपापल्या परीने केलेल्या विकासकामांची यादी, विविध समाजपयोगी घेतलेले कार्यक्रम यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून आपापल्या पक्षाचे शक्तिप्रदर्शन जोरात करत आहेत.

राष्ट्रवादीचा दावा…?

कुणबी – तेली बहुल समजल्या जाणाऱ्या साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार हे कुणबी जातीचे आहेत. मागील दोन दशकापासून या मतदारसंघाची निवडणुक कुणबी – तेली या जातीय समिकरणावर लढली गेली. २०२४ च्या होणाऱ्या विधानसबा निवडणुकीत भाजपाकडे कुणबी जातीचा उमेदवार नसल्यामुळे कुणबी असलेल्या राष्ट्रवादीच्या एका जि. प. सदस्यांना महायुतीकडून लढविल्या जाण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत जि. प. सदस्य असलेल्या राष्ट्रवादीच्या त्या इच्छुक नेत्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, महायुतीकडून संधी मिळाल्यास संधीचे सोने करू. परंतु, असे असले तरी निवडणुक कोणत्या चिन्हावर लढणार यावर त्यांनी मौन पाळले. एकंदरीत मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाची संघटनात्मक बांधणी असल्यामुळे या मतदारसंघावर पक्ष दावा करत असावा असे राजकिय जाणकारांचे मत आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article उपमुख्यमंत्र्यांच्या जनसन्मान यात्रेत गैरहजर राहणाऱ्या मुख्याधिकाऱ्याची पडद्यामागुन दबंगगिरी.?
Next Article पदाधिकारी निवडणार भाजपचा उमेदवार : आज पक्षांतर्गत मतदान
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account