>>>>>भंडारा चौफेर : विशेष प्रतिनिधी
महायुतीने जाहीर केलेल्या उमेदवाराविरोधात गेल्या काही दिवसांपासून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केल्या जात होती. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरीचा इशारा दिला होता. याअंतर्गत साकोली विधानसभा मतदारसंघाचिया निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरीची भूमिका घेत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा निवडणुकीतील टेन्शन वाढल्याची चर्चा आहे.
येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विविध उमेदवारांनी 29 आक्टोबरपर्यंत अर्ज दाखल केले होते. या नामनिर्देशनपत्रांतर्गत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती.
मात्र, साकोली मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना माविआअंतर्गत तर अविनाश ब्राह्मणकर यांना महायुतीअंतर्गत भाजपती उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी महायुतीने जाहीर केलेल्या उमेदवाराला भाजप कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला होता.
या विरोधाबाबत भाजप कार्यकर्त्यांनी भाजपच्याच मूळ कार्यकत्यार्ला किंवा पदाधिकाºयाला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, वरील मागणीनुसार उमेदवारी जाहीर न केल्यास बंडखोरीचा इशारा देण्यात आला. या इशाºयानुसार भाजपचे डॉ.सोमदत्त करंजेकर व माजी आमदार बाळा काशिवार यांनी अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल केले होते. त्यापैकी बाळा काशीवार यांनी अर्ज मागे घेत डॉ.सोमदत्त करंजेकर यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, 4 नोव्हेंबरला अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले डॉ.सोमदत्त करंजेकर यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने साकोली विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत निश्चित मानली जात आहे. महायुतीच्या उमेदवाराला अपक्ष उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा निवडणुकीतील ताण वाढण्याची चर्चा आहे.
माविआच्या उमेदवाराचा फायदा होणार का?
महायुतीने जाहीर केलेल्या उमेदवाराविरोधात संताप व्यक्त करत भाजप कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे महायुतीच्या मतदारांच्या मतांचे विभाजन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे माविआच्या उमेदवाराला फायदा होणार असून, या उमेदवाराचा निवडणुकीत विजय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दलित मतांसाठी असेल स्पर्धा
गेल्या लोकसभा निवडणुकीत दलित मतदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विजयी झाला. मात्र, विधानसभा निवडणुकीतही माविआच्या उमेदवाराला या मतांचा पाठिंबा अपेक्षित आहे. तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाºया विविध उमेदवारांनाही दलित मतांच्या पाठिंब्याची अपेक्षा असल्याचे बोलले जात आहे. ज्यासाठी माविआ आणि अपक्ष उमेदवारांमध्ये दलित मतांच्या पाठिंब्यासाठी स्पर्धा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

