चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: विदर्भात भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता ?
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > ताज्या बातम्या > विदर्भात भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता ?
ताज्या बातम्या

विदर्भात भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता ?

पक्षाचा अंतर्गत सर्व्हे, चाणक्य मैदानात उतरणार

चौफेर वार्ता
Last updated: September 21, 2024 6:56 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : गुगल
SHARE

>>>>भंडारा चौफेर | नागपूर प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करत आहेत. शिवाय आपल्या स्तरावर सर्व्हेही केले जात आहेत. भारतीय जनता पक्षानेही असा एक निवडणूक पूर्व सर्व्हे केला आहे. हा सर्व्हे धक्कादायक असल्याचे सांगितले जाते. त्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकीत भाजपला विदर्भाने साथ दिली होती. मात्र, यावेळी याच विदर्भात भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही स्थिती पाहाता परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने भाजपचे चाणक्य समजले जाणारे गृहमंत्री अमित शहा स्वतः मैदानात उतरणार आहेत. त्या; पार्श्वभूमीवर ते सोमवारी , २३ सप्टेंबरला नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत.

मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये विदर्भाने भाजपला साथ दिली आहे. भाजपच्या एकूण जागांच्या ३३ टक्के जागा या भाजपला विदर्भातून जिंकता आल्या आहेत. विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत. या जागांचा भाजपने अंतर्गत सव्र्व्हे केला आहे. या सव्र्व्हेनुसार भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ६२ पैकी ३० जागाच भाजपला मिळताना दिसत आहेत. तसे झाल्यास एकूण जागांच्या संख्येवर परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सत्तास्थापनेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. याची गंभीर दखल पक्ष श्रेष्ठींनी घेतली आहे. त्यामुळे भाजपचे चाणक्य समजले जाणारे गृहमंत्री अमित शहा स्वतः विदर्भाकडे लक्ष देणार आहेत. ते येत्या २३ सप्टेंबरला विदर्भात येत आहेत.

नागपुरात ते पक्षाची बैठक घेऊन विदर्भातल्या प्रत्येक जागेचा आढावा घेतील अशी माहिती आहे. कदाचित हा कार्यक्रम मागे पुढे होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. असं असलं तरी विदर्भाचा आढावा शहा स्वतः घेणार आहेत हे निश्चित आहे. विदर्भात कोणत्याही स्थितीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याची त्यांची रणनीती आहे.

त्यात जागा वाटपावरुन नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. विदर्भात अनेक जागांवर एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे तिढा निर्माण झाला आहे. विदर्भात काही जागांवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा ठोकला आहे. मात्र, भारतीय जनता पक्षासाठी विदर्भ हा वालेकिल्ला समजला जातो. अशावेळी भाजप आपल्या जागा सोडायला तयार नाही. तर महाविकास आघाडीनेही मोठं आव्हान भाजपसमोर विदर्भात उभे केले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसचा जोरदार दणका

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जोरदार दणका देत काँग्रेसने मुसंडी मारली होती. विदर्भात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. विदर्भात एकूण लोकसभेचे दहा मतदारसंघ आहेत. त्यापैकी गडचिरोली, रामटेक, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या सात जागा महाविकास आघाडीने खेचून आणल्या.

तर महायुतीच्या पारड्यात केवळ नागपूर, अमरावती आणि बुलढाण्याची जागा आली. नागपूरची जागा सोडत अकोला आणि बुलढाण्यात महायुतीला विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीचा विचार करता ६२ पैकी ४२ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले होते. तर महायुतीला केवळ १७ मतदारसंघात मताधिक्य होते.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article रामटेक विधानसभेवर मशालच पेटणार: किशोरी पेडणेकर
Next Article माजी नगराध्यक्षाच्या बनावट साक्षऱ्या करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!
जिल्हा दूध-संघ निवडणुकीत टाय ; सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच
चौफेर वार्ता राजकारण
शिवसेना-भाजप वाद विकोपाला; फुके-भोंडेकर आमनेसामने
चौफेर वार्ता राजकारण
Milk union election : नाना पटोले-नरेंद्र भोंडेकर यांचा एकत्रित लढा
राजकारण विदर्भ
जिल्ह्यातील पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व कायम     
राजकारण विदर्भ
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account