>>>>>भंडारा चौफेर | लाखांदूर प्रतिनिधी
येत्या काही दिवसांत राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या शक्यतेचा विचार करून प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचा उत्साह निर्माण करण्यासाठी गावोगावी बूथ समित्या मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, प्रमुख राजकीय पक्षांचे अधिकारी व कार्यकर्ते तालुक्याच्या सर्वच गावांतील बूथ समित्या मजबूत करण्यात व्यस्त दिसून आल्याने तालुक्यामध्ये राजकीय हालचाली गतीमान झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : भावी आमदार ! साकोली मतदारसंघात आता ‘या’ जि. प. सदस्याचे झळकले बॅनर
साकोली मतदारसंघातील निवडणुकीसाठी माविआच्या काँग्रेस पक्षांतर्गत विद्यमान आमदार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या उमेदवारीबाबत स्वत: नाना पटोले यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणूक विजयासाठी पक्ष व बूथ कमिटी मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तालुक्यामधील काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येक गावात पोहोचून बुथ कमिटीच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असून बूथ कमिटी मजबूत करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : भंडारा पवनीत ‘कमळ’च हवे भाजप पदाधिकाऱ्यांचा हट्ट : महायुतीत खडा पडण्याची चिन्हे
तर महायुतीच्या भाजप पक्षांतर्गत साकोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत विविध उमेदवारांच्या नावांची चर्चा आहे. ज्यामध्ये माजी आमदार बाळा काशीवार, डॉ.सोमदत्त करंजेकर, ऍड. वसंत अंचिलवार, विद्यमान विधानपरिषद सदस्य डॉ.परिणय फुके, डॉ.विजया नांदूरकर आदींची नावे चर्चेत आहेत, तर नुकतेच राष्ट्रवादीचे (अजित पवार) गटाचे जि.प. सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांचे नाव चर्चेत आहे.
साकोली विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा सुरू झाली आहे. मात्र, येत्या काही दिवसांत निवडणुका जाहीर होताच महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार) गटातील संभाव्य उमेदवारांपैकी एकाचे नाव जाहीर केले जाणार आहे.
हेही वाचा : वेध विधानसभेचे : जिल्ह्यात महायुतीसाठी विषय लई हार्ड हाय ए ?
मात्र या घोषणेपूर्वीच भाजपचे पदाधिकारी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठकही झाली पक्षाच्या संघटनेसोबत आणि बूथ समित्यांना बळकट करण्यासाठी मार्गदर्शन करणे. एकंदरीतच बूथ समित्या मजबूत करण्यासाठी तालुक्यामधील प्रमुख राजकीय पक्षांचे अधिकारी व कार्यकर्ते प्रत्येक गावात मार्गदर्शनासाठी पोहोचत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसजनांमध्ये उत्साह
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला राज्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले असून या यशाच्या जोरावर आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा मोठा विजय अपेक्षित आहे तसेच दरम्यान, हा विजय मिळाल्यास नाना पटोले हे काँग्रेस पक्षांतर्गत राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसजनांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : योजनेच्या लाभासाठी पिंपळगावच्या सरपंच बनल्या आजीबाई
साकोली मतदारसंघातील नाना पटोले आमदार झाल्यावार ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार या शक्यतेमुळे मतदारांसह सर्वसामान्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असल्याने साकोली मतदारसंघात पटोले प्रचंड मतांनी विजयी होणार असल्याची चर्चा आहे.मतविभागणीवर महायुतीचा विजय अवलंबून आहे.
हेही वाचा : साकोली विधानसभा : महायुतीचा उमेदवार कोण? जोरदार रस्सीखेच
गेल्या लोकसभा निवडणुकीत दलित मतदारांनी एकत्र येऊन माविआच्या समर्थनार्थ मतदान केल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत माविआच्या उमेदवारांना मोठा विजय मिळाला. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीतही वरील स्थिती कायम राहिल्यास या निवडणुकीतही माविआचेच उमेदवार विजयी होतील.
हेही वाचा : आमचे ठरले!भंडारा पवनी विधानसभा आता आमची : माजी खा.मधुकर कुकडे
परंतु, आगामी काळात दलित मतांचे विभाजन करण्यात महायुतीचे उमेदवार यशस्वी झाले तरच महायुतीच्या उमेदवारांना विजय मिळण्याची शक्यता आहे. अशी अपेक्षीत चर्चा पाहायला मिळत आहे. एकूणच मतांच्या विभागणीवरच महायुतीचा विजय अवलंबून असेल, असा दावा मतदारांमधून केला जात आहे.

