भंडारा चौफेर प्रतिनिधी | अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतशिवार परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी शनिवारी (दि.14) दुपारी अचानक दारुभट्टीवर धाड घालून 1200 किलो मोहफूल जप्त केली असून, मुनेश्वर उर्फ मुन्ना जेगोजी कुंभलकर (वय 42) अड्याळ असे आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखा भंडारा चे पोलीस निरीक्षक, नितिनकुमार चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा येथील पोलीस अधिकारी कर्मचारी, पवनी उपविभागात अवैध धंदे नष्ट करण्याचे हेतूने, पथक नेमन्यात आले आहे. सदर पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना गोपनीय माहितीच्या आधारे अड्याळ येथील शेत शीवारातील नाल्याच्या किनारी मोहफुलाची हातभट्टी लावुन दारू गाळत असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून आरोपी मुनेश्वर कुंभलकर याच्या ताब्यातून, मोहफुलाची दारू गाळण्याकरिता प्लास्टिक ड्रम मध्ये एकूण 1200 किलो मोहफास व, इतर दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी, पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात नितीन महाजन, राजेश पंचबुधे, मंगेश माळोदे यांनी सदरची कारवाई केली असून, आरोपीविरुद्ध अड्याळ पोलिसांत कलम 65, (फ) महाराष्ट्र दारू बंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.