भंडारा | अड्याळ पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली. वाकेश्वर येथील पटाची दान परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ५२ तासपत्ते, रोख रक्कम आणि सहा दुचाकी वाहनांसह एकूण ४ लाख ११ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस उपनिरीक्षक चव्हाण हे पथकासह पेट्रोलिंग करीत असताना वाकेश्वर येथे संशयितरित्या एकत्र आलेले सहा जण दिसून आले. चौकशीअंती त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व वाहने मिळून आली. यात फळावर ५२ तासपत्ते तसेच रोख १९ हजार ५०० रुपये, हिरो स्प्लेंडर प्लस एमएच ३६ एएस ०२०१, ७५ हजार रुपये, दुचाकी एमएच ३६ एजे ४०३३, ५० हजार रुपये, टीव्हीएस ज्यूपिटर स्कूटी एमएच ३६ एएफ ६४३५, ५५ हजार रुपये, हिरो एक्स्ट्रीम एमएच ३६ एपी ८६९९, १ लाख ३० हजार रुपये, हिरो एचएफ डिलक्स एमएच ३६ एएफ ६५६८, ५० हजार रुपये, नोकिया कीपॅड मोबाईल (१,५०० रुपये), व्हिवो अँड्रॉइड मोबाईल (१०,००० रुपये) आणि दोन ओप्पो अँड्रॉइड मोबाईल (प्रत्येकी १०,००० रुपये) यांचा समावेश आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुभाष नारायण पेंदे (वय ४४, रा. वाकेश्वर), सुधीर तुकाराम देशमुख (वय ३५, रा. अड्याळ), भावेश भाष्कर खोब्रागडे (वय ३७, रा. मालीपार), घनश्याम निलकंठ मारवाडे (वय ४६, रा. वाकेश्वर), रितीक किशोर कठाणे (वय २४, रा. गणेशपूर) आणि अभिनंदन प्रेमदास दुबे (वय २१, रा. गोलेवाडी) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात मुंबई जुगार कायद्याच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पाटील, पोउपनि चव्हाण, पोहवा दौलत मारबते, पोहवा मंगेश मारबते यांच्या पथकाने केली. पुढील तपास अड्याळ पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.
अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

