भंडारा : अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांसाठी पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण निवड चाचणीचे आयोजन आशय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या चाचणीसाठी इच्छुक उमेदवारांनी २ जुलै २०२५ रोजी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. मुस्लिम, जैन, बौद्ध आणि पारशी समाजातील निवड झालेल्या उमेदवारांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आधार कार्ड, १२ वीची गुणपत्रिका, डोमिसाईल किंवा राशन कार्ड यासारखी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. ही निवड चाचणी अर्जुन अकॅडमी, कारधा, भंडारा येथे होणार आहे.अधिक माहितीसाठी आशय बहुउद्देशीय संस्थेशी संपर्क साधावा, असे संस्थेमार्फत कळविण्यात आले आहे.
अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण निवड चाचणी

