चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: बोनसची थकबाकी त्वरित द्या ; शेतकरी संघटनेची मागणी
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > ताज्या बातम्या > बोनसची थकबाकी त्वरित द्या ; शेतकरी संघटनेची मागणी
ताज्या बातम्या

बोनसची थकबाकी त्वरित द्या ; शेतकरी संघटनेची मागणी

विलंबाने आर्थिक संकट; शेतकऱ्यांचा संताप

चौफेर वार्ता
Last updated: April 24, 2025 7:37 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : गुगल
SHARE

भंडारा : शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस जाहीर केला, परंतु अनेक महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. शासन आदेशाच्या अभावामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली आहे. यामुळे जाहीर केलेला बोनस तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने केली आहे.

महायुती सरकारने मागील वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणेनंतर तब्बल एक वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतीचा वाढता खर्च आणि हमीभावाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढत आहे. “हा प्रश्न केवळ आर्थिक मदतीचा नाही, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे. सरकारने त्वरित बोनस वितरित करावा अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष धनंजय लोहबरे यांनी केली.

विलंबाने शेतकऱ्यांचे हाल

शेतीच्या उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना, बोनस आणि हमीभाव वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. याचा परिणाम त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेवर आणि मुलांच्या शिक्षणावर होत आहे. “घोषणा करणे सोपे आहे. परंतु प्रत्यक्षात आणणे सरकारला जड जात आहे. आता शेतकऱ्यांना आश्वासनांची नाही, तर कृतीची गरज आहे,” अशी खंत लोहबरे यांनी व्यक्त केली.

अन्यथा आंदोलनाचा इशारा

शासनाने शेतकऱ्यांचा आवाज गांभीर्याने घेऊन बोनस वितरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने दिला आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article साकोली भूमि अभिलेख कार्यालयाचा डिजिटल क्रांतीकडे वाटचाल
Next Article ग्रामपंचायतीचा कर भरा अन, विमानाने प्रवास करा
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account