>>>>रवि भोंगाने | भंडारा चौफेर
साकोली | आगामी काही महिन्यांवर महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.काही दिवसात या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोग करू शकतो. निवडणुकांच्या तारखेची घोषणा होईल तेव्हा होईल.मात्र गावगाड्यात आता राजकीय गप्पाटप्पांना सुरुवात झाली आहे.
हेही वाचा : ते फिरू लागलेले वारा वारा, रंगुनी रंगांत साऱ्या, निवडणुका आल्या…
गावातील चौक,पानटपरी,आणि सार्वजनिक ठिकाणे राजकीय निवडणूकीची चर्चा केंद्र ठरू लागली आहेत. त्यामुळे दोस्ताच्या मैफिलीत हमखासपणे एक शब्द मित्रांकडून निघतांना दिसून येत आहे तो म्हणजे,मित्रा ! आपल्या भाऊची विधानसभेची तिकीट पक्की ?
सोशल मीडिया आणि यूट्यूब सध्या ग्रामीण भागात प्रभावी ठरतांना दिसून येत आहेत.ज्या प्रकारे साकोली विधानसभा मतदार क्षेत्रातून लोकांच्या प्रतिक्रियासह यूट्यूब व्हिडिओ व्हायरल होऊ लागलेत त्यानुसार राजकीय ज्वर पसरण्यात सुरुवात झाली आहे.
आगामी महिन्यात थंडीची चाहूल लागेल तेव्हा राजकीय हिवताप मतदाराच्या चांगल्याच अंगात भिणल्याचे दिसून येईल. विधानसभा क्षेत्रात कार्यकर्ते आणि मतदार विविध पक्षांच्या उमेदवाराची चर्चा जरूर करतात. परंतु वरिष्ठ स्तरावर उमेदवारांची संभाव्य यादी आधीच निश्चित झाली असते.
हेही वाचा : बापू, लढाई तुलेच लढा लागते, बाकी कोणी खाली नाह्यी…!
फक्त क्षेत्रात नाराज उमेदवारांनी बंडखोरी करून वातावरण खराब करू नये यासाठी पक्षाकडून विशेष दक्षता घेतली जाते एव्हढेच.एखाद्या विशिष्ट परिस्थितीतच विधानसभा क्षेत्राचा विचार करून उमेदवाराचा ए.बी.फॉर्म बदलला जातो.अन्यथा वेळेवर कुठल्याच उमेदवारांची नाव जाहीर होत नाही. वर्षभऱ्यापूर्वीच पक्षाने केलेल्या सर्व्हेच्या आधारेच तिकिटांची निश्चिती जवळपास सगळ्याच पक्षात केली जाते.
हेही वाचा : हे गणराया ! आमदार होऊ दे रे बाप्पा…
निवडणुकीच्या पूर्वीच गावागावात राजकीय विचारांची रंगत वाढू लागली आहे.राजकीय चर्चेत लोक सहभागी होऊ लागले आहेत.त्यात एखादया मित्राजवळ जेव्हा सांगण्यासारखे काही नसेल तर मग एकच टोपी. मित्रा ! आपल्या भाऊची विधानसभेची तिकीट नक्की ?
हेही वाचा : भंडाऱ्याचा पैलवान कोण ?
सध्या गावागावांमध्ये राजकीय चर्चांना ऊत आला आहे आणि तिकडे एका पक्षाकडे तिकीट मिळविण्याच्या ट्वेंटी-ट्वेंटीचा राजकीय क्रिकेट सामना रंगात आला आहे.पक्षाची तिकीट तुम्हालाच मिळेल असे सर्वानाच आश्वस्त करण्यात येते आणि राजकारणात असे करावेच लागते
अंदर बाहर की खबर…
आतमधली गोष्ट अशी की,
विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आणि प्रचाराकरिता एका पक्षाने दोन चारचाकी वाहनांची व्यवस्था एका उमेदवाराला करून दिल्याची वरकरणी चर्चा मतदारांत सुरू आहे. ही गोष्ट खातरजमा होईल तेव्हा होईल.पण ही गोष्ट जर खरी निघाली तर निवडणुकीच्या तोंडावर विधानसभा क्षेत्रात काही तालुकाध्यक्ष बदलतील अशी दबक्या आवाजात चर्चा सूरू आहे.
“राजकारण म्हणजे नेमकं
आहे तरी काय?
तर तू ओढ माझे पाय
आणि मी ओढतो तुझे पाय.
तू फक्त बोट दे
मी लगेच मनगट धरतो.
संधी मिळताच तुझा गेम
बघ किती पटापट करते