>>>>>>भंडारा चौफेर | श्यामसुंदर उके
साकोली विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या व त्याविषयीची जनजागृती व्हावी या उद्देशाने जि.प.सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांच्या नेतृत्वात २८ सप्टेंबर पासून परिवर्तन यात्रेला लाखनी तालुक्यातील गडेगाव येथुन सुरूवात झाली आहे.साकोली विधानसभा क्षेत्रात मातब्बर उमेदवारांनी क्षेत्राचे नेतृत्व केले. परंतु साकोली विधानसभा क्षेत्राचा पाहिजे तसा विकास झाला नाही.उद्योगधंदे, सिंचनाच्या सुविधा,वैद्यकीय सोयी,कृषी विकासाचे धोरण याबाबतीत विधानसभा मागासलेलीच राहिलेली आहे.
वैद्यकीय क्षेत्राच्या विकासात फक्त इमारती उभ्या दिसतात.परंतु अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नाहीत.महत्त्वाच्या वैद्यकीय उपकरणांविषयी कोणताही लोकप्रतिनिधी आमदार वा खासदार व अन्य पुढारी देखील यांनी प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.लाखनी येथे ग्रामीण रुग्णालय केवळ नावाचे आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत.पेशंटला नेहमीच लाखनी टू भंडारा किंवा नागपूर असा रेफर केले जातो.
या सर्व बाबींविषयी जनसामान्यात जाणीव व्हावी, क्षेत्राचा मागासलेपणा नागरिकांच्या लक्षात यावा, राजकीय पुढाऱ्यांना नागरिकांनी विकास कामांविषयी जाब विचारावे व तो त्यांचा अधिकार देखील आहे. आपले हक्क व अधिकारांची नागरिकांमध्ये जाणीव व्हावी या उद्देशाने जि.प.सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांच्या नेतृत्वात परिवर्तन यात्रेला दिनांक २८ सप्टेंबरपासून गडेगाव येथुन सुरुवात झाली आहे.
यावेळी नागेश वाघाये, धनु व्यास, नरेश इलमकर, उमराव आठोडे, जितेंद्र बोंद्रे, अर्चना ढेंगे, माया अंबुले, प्रतिक्षा गोस्वामी, मनोहर खराबे, अनिल मेश्राम, रमेश रामटेके, राजू मेश्राम, भारती गायधने, विक्की परमार, रोहित साखरे, चेतन बांडेबुचे, मेघराज शेळके, टेकराम तलवारे आदी मान्यवरव बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

