>>>>> भंडारा चौफेर प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणूकीची घोषणा ही कोणत्याही क्षणी होऊ शकते. महाविकास आघाडीच्या वतीने तिकीटाचे वाटप करण्यासाठी दि.२० सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक घेण्यात आली. यात भंडारा जिल्ह्याचा विषय पुढे आला.यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गट तुमसर विधानसभा तर लढणारच आहे.
सोबतच भंडारा-पवनी विधानसभा देखील लढण्याची तयारी शरद पवार यांनी मुंबईच्या सभेत बोलून दाखवली. त्यामुळे आता भंडारा-पवनी विधानसभा ताकदीने लढण्यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गट सज्ज असल्याची माहिती बैठकीत सांगण्यात आली.
मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राची मागणी केली असून, जनतेपर्यंत शरद पवार यांच्या सूचना पोहचविण्यासाठी दि.२१ सप्टेंबर रोजी भंडारा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे.येत्या दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार)गट यांच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागा,तयारीला सुरुवात झाली आहे,आता आमचा ठरले! अशी घोषवाक्य देत माजी खासदार मधुकर कुकडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती सांगितली.
यावेळी भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम,पवनी तालुकाध्यक्ष कुणाल पवार,भंडारा तालुकाध्यक्ष ईश्वर कळंबे, शहराध्यक्ष मधुकर चौधरी,सुकराम अतकरी,राकेश शामकूवर,मधुकर भोपे,अथर्व गोंडाने,नीलिमा रामटेके,योगिता सूर्यवंशी,लता बावनकुळे,शरीफ खान,राजा खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.