चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: लाखनी शहराला अखेर ‘सुरक्षा कवच’ ; आ. फुके यांच्या प्रयत्नांमुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास प्रारंभ
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > चौफेर वार्ता > लाखनी शहराला अखेर ‘सुरक्षा कवच’ ; आ. फुके यांच्या प्रयत्नांमुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास प्रारंभ
चौफेर वार्ता

लाखनी शहराला अखेर ‘सुरक्षा कवच’ ; आ. फुके यांच्या प्रयत्नांमुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास प्रारंभ

बसस्थानकसह २० महत्त्वाच्या ठिकाणी लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

चौफेर वार्ता
Last updated: November 15, 2025 1:24 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE


>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर

राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी हे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शैक्षणिक व व्यापारी केंद्र आहे. शहराच्या मुख्य बसस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची प्रतीक्षा होती. दरम्यान, यापूर्वी प्रकाशित झालेल्या बातमीची दखल घेत आणि लाखनी शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचे गांभीर्य ओळखून, विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांच्या विशेष प्रयत्नाने शहरातील बसस्थानक चौकसह एकूण २२ महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.यामुळे प्रवाशांची धाकधूक कमी होऊन वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे.

लाखनी बसस्थानक परिसरात दररोज शेकडो प्रवाशांची वर्दळ असते. बसस्थानकाचे नूतनीकरण झाले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव होता. याचा फायदा घेत भुरटे चोर प्रवासी सामानाची चोरी करत होते. तसेच महिलांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेची चिंता पालकांना सतावत होती.
लाखनी शहरात वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटना, बेशिस्त वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण पाहता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज प्रकर्षाने जाणवत होती.

दरम्यान, लाखनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी आणि बसस्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असल्याची बाब आमदार डॉ. परिणय फुके यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. आमदार डॉ. परिणय फुके यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून शहराच्या सुरक्षेसाठी विशेष योजना आखली. या योजनेनुसार लाखनीतील २२ प्रमुख ठिकाणी कॅमेरे बसविण्याची मंजुरी देण्यात आली असून, यात केवळ ‘बुलेट’ कॅमेरेच नव्हे तर, गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन आणि पॅन-टिल्ट-झूम कॅमेऱ्यांचाही समावेश आहे.

हे सीसीटीव्ही कॅमेरे बसल्यामुळे वस्तू चोरीला जाण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल महिलांच्या सुरक्षेवर प्रभावी नजर ठेवता येईल. बसस्थानक परिसरातील कोणत्याही प्रकारच्या असामाजिक कृत्यांवर आळा बसेल. तसेच भरधाव वाहने आणि बेशिस्त वाहतुकीचे नियंत्रण करणे शक्य होईल. सीसीटीव्ही कॅमेरे आता प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी एक अत्यावश्यक सुरक्षा साधन बनले आहे. आमदार डॉ. परिणय फुके यांच्या तत्परतेमुळे, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली लाखनी शहराची ही महत्त्वाची मागणी अखेर पूर्ण करण्यात आली आहे.

या परिसरात लागणार कॅमेरे

पिंपळगाव/सडक, मानेगाव/सडक, जणसुविधा केंद्र, केके लॉन, बस्थानक परिसर, लाखोरी/फाटा, दत्तनगर प्रभाग १२, लाखोरी रोड, जयस्तंभ चौक, गुजरी चौक, जि.प शाळा, परिसर, शिवमंदिर, बुद्धविहार सिंधी लाईन चौक, शहीद चौक सोमलवाडा रोड, पंचायत समिती कार्यालय चौक, तहसील कार्यालयचौक, समर्थ ग्राउंट, कुमार पेट्रोल पंप, केसलवाडा/फाटा, बनसी डेअरी, गडेगाव/फाटा, खुटसवारी/फाटा.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article पहिल्या दिवशी ‘शून्य’ नामांकन ; नगरपालिका निवडणुकीत सावध पवित्रा
Next Article पीएम किसान सन्मान निधीचे थांबलेले हप्ते पुन्हा सुरू होणार
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account