>>>>>भंडारा चौफेर | नागपूर प्रतिनिधी
अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केले की महायुतीतील सर्व नेते खोटे बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर त्या भाजप नेत्याचा व्हिडीओ करत पोस्ट लिहीली आहे.
महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र, या योजनेसाठी अर्ज भरण्यापासून बहिणींची झालेली फरफट याची चर्चा झाली. त्यानंतर आता अनेक बोगस लाभार्थ्यांनीही या योजनेचा फायदा घेतल्याचे उघड होत आहे.
हेही वाचा : पटोलेंचा पराभव करणे ‘हे’ भाजपासाठी आव्हानच?
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना महायुतीने एवढा मोठा खर्च का केला, तसेच राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना आणखी किती काळ चालणार असे प्रश्न उपस्थित होत आहे. आता ही योजना का आणली, याची माहिती भाजप नेत्यानेच दिली आहे. याबाबत पोस्ट करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

