चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: भंडाऱ्यात 51 फूट उंचीच्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे लोकार्पण
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > ताज्या बातम्या > भंडाऱ्यात 51 फूट उंचीच्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे लोकार्पण
ताज्या बातम्या

भंडाऱ्यात 51 फूट उंचीच्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे लोकार्पण

खांब तलावाच्या मधोमध असलेल्या मूर्तीपर्यंत जाण्यासाठी 30 फुटाचा रॅम्प

चौफेर वार्ता
Last updated: October 11, 2024 5:23 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

>>>>>>भंडारा चौफेर | भंडारा प्रतिनिधी

भंडारा शहरातील ऐतिहासिक खांब तलावाच्या सौंदर्यात भर घालतानाच, त्याचे धार्मिक महत्त्व जपण्याचा संकल्प सोडलेल्या आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नातून खांब तलावाचे नवे रूप भंडारेकरांच्या पुढे आले आहे.

तलावाच्या मधोमध एक रॅम्प उभारून त्याच्या मध्यभागी उभारण्यात आलेली मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांची 51 फूट उंच मूर्तीचे लोकार्पण आ. भोंडेकरांच्या उपस्थितीत गुरुवार (दि.10) रोजी मोठ्या थाटामाटात झाले.

हेही वाचा : पडघम विधानसभेचे : मुलाखतीनंतर आता उमेदवारीची उत्सुकता

यावेळी पंचक्रोशीतील संत महंत, मठ, मंदिर आणि विविध तीर्थस्थळातील विश्वस्तांच्या प्रमुख उपस्थिती होती. वेद मंत्रोच्चारात अनावरण करण्यात आले. यामुळे भंडारा शहराला एक वेगळी ओळख मिळेल. या अनावरण सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध भजन गायक हंसराज रघुवंशी यांच्या भजन संस्थेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पुणे येथील कला संस्कार आर्ट स्टुडिओतर्फे शिल्पकार महेंद्र थोपटे यांनी अवघ्या सहा महिन्याच्या अथक परिश्रमाने ही मूर्ती घडविली आहे. खांब तलावात मधोमध ही मूर्ती ठेवण्यात आली असून तलावातील गाळ काढल्यामुळे तलाव ऑलरेडी खोल आहे.

हेही वाचा : पडघम विधानसभेचे : आता ‘डीएमके’च्या मतांसाठी भाजप नेमणार बूथनिहाय पालक

मूर्तीपर्यंत जाण्यासाठी 30 फुटाचा रॅम्प तयार करण्यात आला असून या रॅम्पला रामझुला असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे तलावाच्या मधोमध दगडासारख्या दिसणाऱ्या चट्टानावर ही मूर्ती विराजमान झाली आहे.

मूर्तीची वैशिष्ट्ये

  • श्रीरामाची मूर्ती 51 फुट उंचीची आहे.
  • मूर्ती जेएफआरसी व फाईबर तसेच विशिष्ट केमिकलने तयार केली आहे.
  • कालावधी : सहा महिने
  • मूर्तीपर्यंत जाण्यासाठी 30 फुटाचा रॅम्प आहे.
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article पडघम विधानसभेचे : मुलाखतीनंतर आता उमेदवारीची उत्सुकता
Next Article सामान्यांसाठी सर्वसामान्य झाला : युथ आयकॉन सुनीलभाऊ
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account