पंचायत समिती येथील सदस्यांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व असून नऊ पंचायत समिती सदस्य काँग्रेसचे तर तीन अपक्ष आहेत. या क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वात पंचायत समिती सभापतीपदी ललित हेमने (बांपेवाडा) आणि उपसभापतीपदी करुणा वालोदे (पळसगाव) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
हेही वाचा : लाखनी पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व
पंचायत समितीची निवड प्रक्रिया 20 जानेवारी रोजी पंचायत समिती भवन, साकोली येथे संपन्न झाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या 8 सदस्यांनी व 3 अपक्ष सदस्यांनी सभापती व उपसभापती यांच्या निवडीसाठी मतदान केले. सभापती व उपसभापतींचा हा कार्यकाळ दुसऱ्या टर्मचा असून, निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी निलेश कदम आणि बी.डी.ओ. जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली.
हेही वाचा : ग्रामपंचायतीच्या कारभारात महिला सरपंच पतीचा अवाजवी हस्तक्षेप
निवडणूक प्रक्रियेदरम्यान काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य होमराज कापगते गैरहजर असल्याचे दिसून आले. निवडीनंतर बांपेवाडा व पळसगाव परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद पाहायला मिळाला. माजी सभापती गणेश आदे,उमेश भेंडारकर, एच.बी. भेंडारकर, नेपाल कापगते,सोनू बैरागी तसेच समस्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सभापती ललित हेमने आणि उपसभापती करुणा वालोदे यांचे अभिनंदन केले.