जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) माजी महिला आघाडी तालुकाध्यक्षांसह तब्बल शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आमदार नाना पटोले आणि खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास दर्शवत, हा महत्त्वपूर्ण राजकीय प्रवेश करण्यात आला. यामुळे लाखनी तालुक्यात काँग्रेसची ताकद प्रचंड वाढली आहे, तर ‘अजित गटा’च्या स्थानिक बांधणीला मोठे भगदाड पडले आहे.
प्रमुख नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचे पक्षांतर
या प्रवेश सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या माजी महिला तालुका अध्यक्षा माया अंबुले यांनी काँग्रेसच्या विचारधारेला प्रेरित होऊन प्रवेश केला. त्यांच्यासोबत छाया राहांगडाले, माधुरी राहांगडाले, कुमुद राहांगडाले, रोशनी राहांगडाले, कमलाबाई थोटे, नारायण राहांगडाले, केवळराम राहांगडाले, दर्यावजी राहांगडाले, महादेव राणे, सुखचंद पटले, उमेश राहांगडाले, लालदास बडोले, जितेंद्र राहांगडाले, दिपक राहांगडाले, पुरुषोत्तम पटले, प्रेमलाल भांडारकर, राजकुमार भांडारकर, मधुकर सोनटक्के, घनश्याम सोनटक्के, शेषराव बडोले, प्रकाश मांढरे, मुकुंदा दिघोरे, अजय दिघोरे, सुकराम पटले, मनोज पटले यांसारख्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनीही काँग्रेसचा हात धरला.
काँग्रेस नेत्यांकडून स्वागत
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व नूतन सहकाऱ्यांचे पक्षात उत्साहाने स्वागत केले. लाखनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष योगराज झलके, जिल्हा परिषद सदस्या डॉ. मनिषा निंबार्ते, जिल्हा महासचिव राजूभाऊ निर्वाण, काँग्रेस नेते डॉ. विकास गभने, संचालक खरेदी-विक्री समिती लाखनी जयकृष्ण फेंडरकर, जिल्हाध्यक्ष सेवादल कैलास भगत, धनपाल बोपचे, संजीव राहांगडाले, झुल्पीकार हुमणे, शंकर मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.काँग्रेस पक्षात नव्या ऊर्जेचा संचार झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. “जनतेच्या हक्कासाठी संघर्ष अधिक जोमाने सुरू राहील. अशी ग्वाही यावेळी नूतन सदस्यांना देण्यात आली. राष्ट्रवादीच्या (अजित गट) स्थानिक नेतृत्वासाठी हा प्रवेश पक्षांतराचा मोठा धक्का मानला जात आहे.

