>>>अतुल नागदेवे | लाखनी
शिवजन्मोत्सवानिमित्त शिवरुद्रम प्रतिष्ठान लाखनी तसेच विविध सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात दि. १८ ते १९ फेब्रुवारी रोजी विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (दि.१८) मंगळवारी महाराजांच्या मूर्तीचे अभिषेक पूजन व आरती करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध व्याख्याते अक्षय राऊत यांचे शिवव्याख्यान होणार असून ‘ मुझे चढगया भगवा रंग गीताचे प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचे लाईव्ह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानंतर श्रीराम कॉम्प्लेक्स येथे दि. १९ बुधवार सकाळी ११ वाजतापासून भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरुद्रम प्रतिष्ठान लाखनी तसेच विविध सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी ३ वाजता श्रीराम मंदिर समर्थ मैदानावरून छत्रपती शिवाजी महाराज भव्य झाकी, ढोल ताशा पथक, शिर्डी साई बाबा झाकी
शेगाव गजानन महाराज झाकी, स्वामीकृपा धुमाल ग्रुप, अघोरी ग्रुप हरियाणा,डफली पथक, लेझीम पथक,ध्वन पथक व घोड्यांचा ताफासह ही भव्य शोभयात्रा निघेल. ही शोभयात्रा बुधवारी समर्थनगर परिसरातील श्रीराम मंदिराजवळून निघणार असून, तहसील कार्यालय चौक पासून ते मुख्य रस्त्याने मोठा बस स्थानक परिसर त्यांनतर, साई मंदिर येथे या शोभयात्रेचे समारोप होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. नाना पाटोले यांच्याहस्ते होणार आहे. विशेष अतिथी पोलीस अधीक्षक नरूल हसन, खा.डॉ प्रशांत पडोळे राहणार असून, प्रमुख पाहुणे आकाश कोरे माजी जी.प सदस्य, मनीषा निंबार्ते जी.प सदस्य, धनंजय देशमुख तहसीलदार लाखनी, हृदयनारायण यादव पोलीस निरीक्षक लाखनी, त्रिवेणी पोहरकर नगराध्यक्षा न.प, आशिष घोडे मुख्याधिकारी न.प, शेषराव वंजारी सरपंच मुरमाडी , सचिन बागडे सरपंच सावरी यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.