>>>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक देखील महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. ज्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे नेतेमंडळींनी राज्यभरात आपले दौरे सुरू केलेले असतानाच आता दुसरीकडे कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पक्षातील प्रमुख नेत्यांचे भावी आमदार, भावी मुख्यमंत्री, भावी मंत्री असे बॅनर झळकण्यास सुरुवात झाली आहे.
हेही वाचा : भंडारा पवनीत ‘कमळ’च हवे भाजप पदाधिकाऱ्यांचा हट्ट
परंतु, यात भरीस भर म्हणून की काय चक्क भावी मुख्यमंत्री म्हणून नावारूपास आलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. मनिषा निंबार्ते यांचा भावी आमदार असा बॅनर झळकला आहे.
लाखनी शहरासह संपूर्ण साकोली विधानसभा मतदारसंघात लावण्यात आलेल्या या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून हालाचालींना वेग आला आहे.
हेही वाचा : वेध विधानसभेचे : जिल्ह्यात महायुतीसाठी विषय लई हार्ड हाय ए ?
इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू असून पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. यातच आता साकोली विधानसभा मतदारसंघात बॅनरबाजीची चर्चा होत आहे. जि. प. सदस्या डॉ. मनिषा निंबार्ते भावी आमदार असे बॅनर लावण्यात आले आहेत.
हेही वाचा : योजनेच्या लाभासाठी पिंपळगावच्या सरपंच बनल्या आजीबाई
लाखनीतील चौकाचौकात मित्र परिवाराच्या वतीने अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत. डॉ. निंबार्ते यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. साकोली मतदारसंघातील गावागावात लागलेले डॉ. मनिषा निंबार्तेचे बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
बॅनरवर डॉ. मनिषा निंबार्ते यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून करण्यात आला आहे. साकोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महायुतीकडून डझनभर इच्छुकांची भावी आमदार म्हणून तर मविआमध्ये खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान आमदार नाना पटोले यांची भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा होऊ लागली आहे.
हेही वाचा : साकोली विधानसभा : महायुतीचा उमेदवार कोण? जोरदार रस्सीखेच
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या क्षेत्रात त्यांचे खंदे समर्थक डॉ.मनीषा निंबार्ते यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याकडून भावी आमदार असा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस मध्येच फुट पडले कि काय असा प्रश्न पडला असल्याने कार्यकर्त्या मध्ये चर्चेचा विषय बनला आहे. तर, डॉ चंद्रकांत निंबार्ते हे कुठे तरी नाराज असल्याची चर्चा विधानसभा क्षेत्रात सुरु आहे. तर त्यांच्या पत्नी मनीषा निंबार्ते यांचे भावी आमदार असा उल्लेख त्यांच्या वाढदिसानिमत्त लागले असता संपूर्ण लाखनी शहरात चर्चाचा विषय बनलेला आहे.
बाई पण भारी देवा…
भावी आमदार म्हणून डॉ. मनिषा निंबार्ते यांचे बॅनर मतदारसंघात झळकले. मात्र, डॉ. निंबार्ते यांना महायुतीकडून पटोलेंच्या विरुध्दात लढण्याची ऑफर असल्याचे महायुतीच्याच स्थानिक नेत्यांकडून बोलल्या जात आहे. डॉ. निंबार्ते ह्या मुरमाडी (सावरी) जिल्हा परिषद क्षेत्रातून भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आल्या आहेत.
काँग्रेस कडून साकोली विधानसभेत खुद्द नाना पटोले यांनी आपली उमेदवारी जाहिर केल्यामुळे काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणे दुरापास्त झाले आहे.
हेही वाचा : आमचे ठरले!भंडारा पवनी विधानसभा आता आमची
विशेष म्हणजे डॉ. निंबार्ते जातीय समिकरणात चपखल फिट बसत असल्याने व नानांचा एका महिलेकडून पराभव करावयाचा असल्यास महायुतीकडून त्यांना उमेदवारी देण्यात यावी असा सूर महायुतीच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडून वेळोवेळी चर्चिल्या जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

