>>>अतुल नागदेवे | लाखनी
भंडारा जिल्हा धान पिकासाठी राज्यभरात ओळखला जातो. जिल्ह्यात धानपिकाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. पारंपरिक धानपिकाच्या शेतीला बगल देत लाखनी तालुक्यातील पोहरा भागातील शेतकऱ्यांनी कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देणार्या टमाटर पिकाची लागवट केली. मात्र, यावर्षी दर घटल्याने या भागातील शेतकर्यांना खूप तोटा सहन करावा लागत आहे.
पोहरा येथील गिरीश नगरकर या शेतकऱ्याने दोन एकर शेतात टमाटरची लागवट केली होती. गिरीश हा मागील पाच वर्षापासून टमाटरचा उत्पन्न घेत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गिरीशने टमाटरची लागवट केली. मात्र, यंदा दर घटल्याने कवळीमोल दराने टमाटर ची विक्री करावा लागत आहे.
गेल्या वर्षी टमाटरचे ४०० ते ५०० प्रती कॅरेट भाव मिळाला होता. परंतु,यंदा टमाटरला बाजारात भाव कमी मिळत असून, ४० ते ५० प्रती कॅरेट रुपये प्रमाणे विक्री करावा लागत आहे. जवळपास एका कॅरेट मध्ये २० ते २२ किलो टमाटर बसतात. भाव मिळत नसल्याने शेतकरी हवादिल झाला आहे. टमाटर लागवट, तोडणी आणि वाहतूक खर्च परवडत नाही. बाजारात एका कॅरेट ४० ते ५० रुपये भाव मिळत आहे. हा दर मागील वर्षी पेक्षा दहा टंक्याने घसरला आहे.
उत्पादनासाठी बी-बियाणे, खते, औषधे, पाणी आणि मजुरी यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च लागतो. त्याचबरोबर तोडणी, वाहतूक आणि बाजारात विक्री करण्यासाठीही अतिरिक्त खर्च करावा लागतो. सध्याच्या घसरलेल्या दरांमुळे हा खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
– गिरीश नगरकर, प्रगतशील शेतकरी पोहरा