- हरियाणात भाजपची हँट्ट्रीक चुकणार?
- काँग्रेस 10 वर्षांनी सत्तेवर येणार?
- हरियाणाचे एक्झिट पोलचे आकडे काय
हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं आहे. आता 8 ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल लागणार आहे. तत्पुर्वी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहे. या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार हरियाणात मोठा उलटफेर होणार आहे.
हरियाणात भाजपची हॅट्ट्रीक हुकणार आहे, तर काँग्रेस 10 वर्षांनी सत्तेत परतणार आहे. सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार हरियाणात भाजपला मोठा धक्का बसणार आहे.
हरियाणात एक्झिट पोलमध्ये भाजपला 20 ते 28 तर काँग्रेसला 50 ते 58 जागा मिळतील असा अंदाज आहे. जेजेपीला 0-2 जागा मिळत आहेत आणि इतरांना 10 ते 14 जागा मिळत आहेत.
हरियाणा एक्झिट पोलचा निकाल
भाजप : 20 ते 28 जागा
काँग्रेस : 50 ते 58 जागा
जेजेपील : 0 ते 2 जागा
अपक्ष : 10 ते 14 जागा

