चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: दीपोत्सवानंतर लोकोत्सव ! मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे संकेत
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > महाराष्ट्र > दीपोत्सवानंतर लोकोत्सव ! मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे संकेत
महाराष्ट्रराजकारणविधानसभा

दीपोत्सवानंतर लोकोत्सव ! मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे संकेत

बाहुबलींना गुन्हे जाहीर करावे लागणार

चौफेर वार्ता
Last updated: September 29, 2024 10:55 am
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

>>>>भंडारा चौफेर | टीम

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील अकरा राजकीय पक्षांशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना सणांची काळजी घ्यावी,” अशी सूचना केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी दिली. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभेच्या निवडणुकीचा बार उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : लाखांदूरच्या कृउबासमध्ये १.८७ कोटींचा गैरव्यवहार

आपले मत आपला हक्क हा निवडणूक कार्यक्रम राज्यात राबवला जाणार आहे. तसेच, निवडणुका कधी घेतल्या जाणार, याबाबतही माहिती देण्यात आली असून सर्व सणासुदीनंतरच म्हणजेच दिवाळीनंतरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

यामुळे राज्यात दीपोत्सवानंतरच लोकशाहीचा उत्सव होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरम्यान, एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश त्यांनी दिले.

हेही वाचा : लाडक्या बहिणीच्या सर्वांगीण विकास व सक्षमीकरणावर विशेष भर देणार

निवडणूक आयोगाच्या टीमने महाराष्ट्रातील प्रस्तावित विधानसभा निवडणुकीबाबत राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. राजीव कुमार म्हणाले, आमचा महाराष्ट्र आमचं मतदान हा आमचा नारा आहे.

लोकशाहीच्या उत्सवात लोक आपले योगदान देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. तसेच आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या. स्थानिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष यांच्याशी भेटीगाठी घेतल्या. पोलीस महासंचालक, आयुक्त तसंच इतरांचीही भेट घेतली. आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते निर्देश दिले. यावेळी पक्षांनी आम्हाला दिवाळीचा मुद्दा सांगितला. तो उत्सव लक्षात घेऊन निवडणूक तारीख जाहीर करावी, अशी विनंती त्यांनी केली.

हेही वाचा : कामे करण्याची धमक फक्त महायुतीच्या नेत्यांमध्येच : अजित पवार

लोकांना मत देताना कुठलीही अडचण होणार नाही याची दक्षता घ्या. जे मतदार फोन घेऊन येतात त्यांना तो सोडून जाताना आणि परत नेताना अडचणी येतात. त्याची व्यवस्था करावी अशीही विनंती करण्यात आली. पैशांचा गैरवापर, मसल पॉवर रोखण्यानीही विनंती केली.

वृद्ध लोकांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था करावी अशीही विनंती करण्यात आली. पोलिंग एजंट हा स्थानिक असावा अशीही विनंती करण्यात आली. असेही राजीव कुमार यांनी सांगितलं. फेक न्यूजचा प्रचार आणि प्रसार थांबवावा अशीही विनंती आमहाला सर्व पक्षांनी केली. दरम्यान, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधक असलेल्या महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

एटीएम व्हॅनला निर्बंध; तक्रारींसाठी अँप

निवडणूक काळात एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या वाहनांवर रात्री ६ ते सकाळी ८ पर्यंत पैसे वाहतूक करण्यावर निर्बंध असणार आहे. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवले जाईल. तसेच निवडणूक आयोगाच्या वतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आले आहे.

हेही वाचा : अमित शहांनी दिला विजयाचा कानमंत्र

या अॅप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशिरापर्यंत मतदान सुरू असेल तर केवळ फोटो काढून या अॅप्लिकेशन्सवर अपलोड केला की, ९० मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथे पोहोचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले

राजकीय पक्षांना सूचना

■ निवडणुकीदरम्यान पैशाचीताकद रोखण्यात यावी

■ मतदान करता यावे म्हणून वृद्धांसाठी व्यवस्था करावी

■ मतदान प्रतिनिधी हा त्याच मतदारसंघाचा असावा

■ मतदानकेंद्रात मतदारांना मोबाईल नेण्यास सक्त मनाई

■ फेक न्यूजविरोधातही कारवाई केली जाणार

खर्च मर्यादा जैसे थे

विधानसभा निवडणुकीत सध्या ४० लाखांची खर्च मर्यादा आहे. ती वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे. दोन ते तीन वर्षांत आम्ही याची पडताळणी करत राहतो. सध्या तरी खर्चाची मर्यादा तीच राहणार असल्याचे आयुक्तांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article लाखांदूरच्या कृउबासमध्ये १.८७ कोटींचा गैरव्यवहार : लेखापरीक्षण अहवालात आरोप
Next Article साकोली विधानसभा : भाजपा फ्रंटफुटवर तर काँग्रेस बॅकफुटवर?
जिल्हा दूध-संघ निवडणुकीत टाय ; सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच
चौफेर वार्ता राजकारण
शिवसेना-भाजप वाद विकोपाला; फुके-भोंडेकर आमनेसामने
चौफेर वार्ता राजकारण
Milk union election : नाना पटोले-नरेंद्र भोंडेकर यांचा एकत्रित लढा
राजकारण विदर्भ
जिल्ह्यातील पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व कायम     
राजकारण विदर्भ
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account