>>>>भंडारा चौफेर : विशेष प्रतिनिधी
लाखनी तालुक्यातील केसलवाडा /वाघ येथील महायुतीच्या प्रचारसभेत सुप्रसिद्ध फिजीशियन डाँ. चंद्रकांत निंबार्ते यांनी महायुतीचे भाजपचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केसलवाडा/वाघ ग्रामवासियांना केले आहे. महायुतीमधील त्यांचा पाठिंब्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी तालुक्यात डाँ. निंबार्ते यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांना जिंकण्यासाठी मोठा कस लागणार हे निश्चित मानले जात आहे.
हेही वाचा : आदिवासी विकास परिषदेचा जाहीरनामा : नाना पटोले यांना मतदान न, करण्याचे आवाहन
डॉ. चंद्रकांत निंबार्ते हे अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या डाक्टर सेलचे भंडारा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यभार पाहत होते. त्यांनी काँग्रेस पक्षांविषयी निष्ठा बाळगून पक्षवाढीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. परंतु त्यांनी केलेल्या कार्याची साधी दखलही न घेता महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमेटीने त्यांना खासदारकीची उमेदवारीही नाकारली होती.
जनसेवेचे व्रत स्वीकारून समाजसेवेत अविरत व निस्वार्थी कार्य करणाऱ्याला काँग्रेस पक्षात सन्मान मिळत नाही या विचाराने त्यांचे मन दुखावल्या गेले. त्याचप्रमाणे काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पक्षपाती धोरण व बेबांधशाहीला कंटाळून त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला
पाठिंबा दिल्याचे चित्र समोर आले आहे.
हेही वाचा : “माझा देश माझा अभियान” लाखनीत मतदान जनजागृती
काँग्रेसच्या डाक्टर सेलचे भंडारा जिल्हाध्यक्ष असलेल्या डाँ. निंबार्ते यांना लोकसभा निवडणुकीत डावलून नाना पटोले यांनी आपल्या मर्जीतील डाँ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली याचे शल्य त्यांना बोचले आहे. तसेच नाना पटोले यांनी आपल्या वीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत साकोली विधानसभा क्षेत्राचा थोडाही विकास केला नाही.
आजही या क्षेत्रात उद्योग धंदे नाहीत, आरोग्यसुविधा नाहीत. एवढेच नाही तर नाना पटोले यांना कार्यकर्ता मोठा झालेला पाहवत नाही. अशी विवंचना डॉ निंबार्ते यांनी व्यक्त केली आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातील जनतेने नवा पर्याय निवडून कमळ फुलवावे असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.त्यामुळे काँग्रेसला सोडचिट्टी दिली की काय? असा सवाल जनतेकडून केला जात आहे.