>>>>>भंडारा चौफेर | लाखांदूर प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत सलग पाचव्यांदा विधानसभा निवडणूक लढविणारे नाना पटोले यांच्याकडे मतदारांमध्ये प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे नाना पटोले यांचा पराभव हे भाजपसाठी आव्हानच ठरत आहे. या स्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात पोहोचून ‘अभी नही तो कभी नहीं ‘चा नारा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : विधानसभा निवडणुकीसंदर्भात राजकीय हालचालींना वेग
साकोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार नाना पटोले हे एकूण 4 वेळा काँग्रेस पक्षाचे आमदार राहिले असून, त्यांच्या सामाजिक व विकासाच्या धोरणांवर ठाम असलेले नाना पटोले यांनी 3 विधानसभा निवडणुका प्रचंड मतांनी जिंकल्या आहेत. तर मागील निवडणुकीत दलित मतांच्या विभाजनामुळे त्यांना केवळ 6 हजार मतांनी विजय मिळाला होता.
हेही वाचा : भावी आमदार ! साकोली मतदारसंघात आता ‘या’ जि. प. सदस्याचे झळकले बॅनर
दरम्यान, काँग्रेस पक्षांतर्गत प्रदेशाध्यक्षपद भूषविलेल्या नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले होते. माविआच्या समर्थनार्थ राज्यातील दलित मतदारांनी दाखवलेली एकजूट या विजयासाठी महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने 400 पारचा नारा देताच देशाची घटना बदलविणार असल्याचा आरोप करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर मविआ अंतर्गत मतदारांना संविधान वाचवण्यासाठी मविआला साथ देण्याचे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा : भंडारा पवनीत ‘कमळ’च हवे भाजप पदाधिकाऱ्यांचा हट्ट : महायुतीत खडा पडण्याची चिन्हे
या हाकेला ‘ओ’ देत राज्यभरात विखुरलेल्या दलित मतदारांनी मविआच्या समर्थनार्थ एकजूट दाखवली होती. त्यामुळे राज्यात मविआचे सर्वाधिक खासदार निवडून आले. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीतही हीच स्थिती राहण्याची शक्यता असून राज्यात मविआचा विजय होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : वेध विधानसभेचे : जिल्ह्यात महायुतीसाठी विषय लई हार्ड हाय ए ?
तर, या विजयानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राज्याचे मुख्यमंत्री होणार, अशी अपेक्षा असल्याने मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पटोले यांच्या सामाजिक धोरणावर भाजप नाराज गेल्या विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये पटोले यांचे सामाजिक आणि विकास धोरण भाजपला जड ठरले आहे. त्यामुळे भाजपच्या मतदारांनी मागील विविध निवडणुकांमध्ये पटोले यांच्या समर्थनार्थ मतदान केल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : योजनेच्या लाभासाठी पिंपळगावच्या सरपंच बनल्या आजीबाई
यावेळी, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करून निवडणुकीचा उत्साह निर्माण केला जात आहे. मात्र नाना पटोले यांनी गेल्या 25 वर्षांच्या राजकीय कार्यकाळात राबविलेल्या सामाजिक व विकासाच्या धोरणांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पटोले यांचा पराभव हे भाजपसमोर मोठे आव्हान ठरू शकते.
‘आता नाही तर कधीच नाही’ चा नारा देऊ नका.
नाना पटोले यांच्या राजकीय कार्यकाळात सामाजिक, विकास आणि जातीय धोरणे महत्त्वाची ठरली आहेत.
या धोरणाच्या जोरावरच भंडारा गोंदिया जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात नानांनी आपला बिनविरोध वर्चस्व कायम ठेवल्याने भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा विजय अशक्य असल्याची चर्चा आहे. त्याचा अंदाज भाजप नेत्यांना आला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपवाले ‘आता नाही तर कधीच नाही’चा नारा देत असल्याची चर्चा आहे.

