चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांना मोबाईलवर शिवीगाळ?
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > विदर्भ > प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांना मोबाईलवर शिवीगाळ?
विदर्भ

प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांना मोबाईलवर शिवीगाळ?

लाखनी पोलिसांत तक्रार, कॉल रेकॉर्डिंग वायरल : राजकीय वातावरण तापले

चौफेर वार्ता
Last updated: November 26, 2024 1:32 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल (दी.२३) नोव्हेंबर रोजी लागले.राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे लाखनी नगरपंचायतीचे स्वीकृत एका नगरसेवक यांनी भाजप भंडारा जिल्हा अध्यक्ष यांच्याशी मोबाईलवर संवाद करतांना काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा नवनिर्वाचित आमदार नाना पटोले यांच्याबद्दल मोबाईलवर अपशब्दात शिवीगाळ केल्याने काँगेस पक्षात व राजकीय वर्तुळात चांगलेच वातावरण तापले आहे.

हेही वाचा : …अखेर नाना कर्मभूमीमुळेच तरले !

नगरसेवक यांनी भाजपा जिल्हा अध्यक्ष यांना शनिवारी (२३ नोव्हेंबर) रोजी रात्रीच्या सुमारास भ्रमनध्वनीवर संपर्क साधला होता. यावेळी जिल्हा अध्यक्ष यांनी विधानसभा निवडनुकीत नाना पटोले निवडून आल्यामुळे त्यांचे अभिनंदन करायला हवे असे बोलणे सूरू असताना मोबाईल फोनवर आ.नाना पटोले यांच्याबद्दल नगरसेवक यांनी अपमानजनक अश्लील भाषेचा वापर करीत शिवीगाळ केली.या फोनवरील संभाषनाची ऑडियो क्लिप समाज माध्यमावर मोठ्यप्रमाणावर व्हायरल झाली आहे.या प्रकारामुळे जिल्ह्यासह लाखनी तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
       
या घटनेची दखल घेत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगराज झलके यांच्या मार्गदर्शनात शंभरहुन अधिक नाराज कार्यकर्त्यांनी (दि.२५) नोव्हेंबर रोजी लाखनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अश्लील संवादामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, संपूर्ण राज्यात मोबाईलची कॉल रेकॉर्डिंग वायरल झाली आहे. एकंदरीत,आमदार नाना पटोले यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा डाव तर नाही ना? असा सवाल जनतेत उपस्थित केल्या जात आहे.
   
या घटनेचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला असून, लाखनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष यांच्याशी मोबाईलवर झालेला संवादाची रेकॉर्डिंग एका पेन ड्राइव्ह मध्ये कैद करून पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आली आहे.मात्र,या प्रकारामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले असुन आ. नाना पटोले यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करणाऱ्या नगरसेवक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँगेस पक्षाकडून तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article …अखेर नाना कर्मभूमीमुळेच तरले !
Next Article महायुतीत मंत्रिपदासाठी रस्सीखेच; जिल्ह्यात दोघे इच्छुक
जिल्हा दूध-संघ निवडणुकीत टाय ; सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच
चौफेर वार्ता राजकारण
शिवसेना-भाजप वाद विकोपाला; फुके-भोंडेकर आमनेसामने
चौफेर वार्ता राजकारण
Milk union election : नाना पटोले-नरेंद्र भोंडेकर यांचा एकत्रित लढा
राजकारण विदर्भ
जिल्ह्यातील पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व कायम     
राजकारण विदर्भ
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account