चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: आचारसंहिता १३ ऑक्टोबरपासून ? सत्ताधारी पक्षांसह विरोधकांचीही लगबग सुरु
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > महाराष्ट्र > आचारसंहिता १३ ऑक्टोबरपासून ? सत्ताधारी पक्षांसह विरोधकांचीही लगबग सुरु
महाराष्ट्र

आचारसंहिता १३ ऑक्टोबरपासून ? सत्ताधारी पक्षांसह विरोधकांचीही लगबग सुरु

चौफेर वार्ता
Last updated: October 4, 2024 7:16 am
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

>>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीचा आढावा दौरा पूर्ण केला, या दौऱ्यात त्यांनी दिवाळीपूर्वी निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, हरियाणा आणि जम्मू काश्मीवर विधानसभा निवडणुकीचा ८ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. यानंतर १० ऑक्टोबरला या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपेल.

हेही वाचा : भावी उमेदवारांनी घेतला ‘लिफाफा सर्व्हे’ चा धसका?

नियमानुसार एका निवडणुकीचा कार्यक्रम संपेपर्यंत दुसरी निवडणूक घोषित करता येत नाही. त्यामुळे राज्यात १३ ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल आणि त्याच दिवशीपासून आचारसंहिता लागू होणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्रात नवी विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात यायला हवी. तत्पूर्वी निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागणे आवश्यक आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४५ दिवसांनी नवीन विधानसभा गठीत करावी लागते.

हेही वाचा : सत्तेच्या पटलावरही ‘नवदुर्गा’ मोठ्या संख्येने प्रस्थापित व्हावी

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान घ्यायचे ठरवले तर त्यासाठी ऑक्टोबरला १३ ते १६ या तारखांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करावी लागेल. त्यामुळे ४५ दिवसांनी राज्यात नवे सरकार येऊ शकते. अलीकडेच विधानसभा निवडणूक वेळेवर होण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले.

हेही वाचा : सरपंच, उपसरपंचाची दसरा, दिवाळी जोमात : घरकुल लाभार्थी कोमात

राज्य विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संप आहे, त्यापूर्वी निवडणूक होईल. विधामसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी अशी मागणी शिंदे सेना आणि अजित पवार गटाने केली आहे. मात्र, निवडणूक किती टप्प्यात होईल हे लवकरच सांगू , असे राजीव कुमार यांनी सांगितले.

दावे-प्रतिदावे सुरू

राज्यात विधानसभा निवडणुकीची गेल्या काही महिन्यापासूनच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. यंदा सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या नाट्यमय राजकीय घटना आणि पक्षफुटीनंतर संपूर्ण राजकीय गणिते बदलली आहे. यामुळे निवडणुकीतील विजयाबाबत दावे प्रतिदावे होत आहेत

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article … आधी पावती फाडा, मग उमेदवारी मागा!
Next Article साकोलीत काँग्रेसचा मजबूत गड कोण भेदणार ?
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account