चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: लाडक्या बहिण योजनेच्या श्रेयवादावरून कॅबिनेटमध्ये खडाजंगी
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > महाराष्ट्र > लाडक्या बहिण योजनेच्या श्रेयवादावरून कॅबिनेटमध्ये खडाजंगी
महाराष्ट्रराजकारण

लाडक्या बहिण योजनेच्या श्रेयवादावरून कॅबिनेटमध्ये खडाजंगी

अजित पवारांनी 'लाडकी बहिणी'चे श्रेय घेतले : हायुतीच्या नेत्यांमध्ये वाक् युद्ध सुरू

चौफेर वार्ता
Last updated: September 6, 2024 9:02 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

ऑनलाईन चौफेर मुंबई | राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या श्रेय वादावरून महायुती मध्ये चांगलेच वाक् युद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यापासून या योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या जनसमान यात्रेनिमित्त लाडकी बहिणी योजनेचे श्रेय ते घेताना दिसत आहेत.

अनेक ठिकाणी बॅनर, पोस्टर आणि जाहिरातीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा प्रचार अजित पवार यांच्यामार्फत होत आहे. मात्र, यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश करण्यात येत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील मंत्री नाराज होत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यातच आता मंत्रिमंडळ बैठकीत देखील या मुद्द्यावरून मंत्र्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एकमेकांविरोधात तक्रार करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाडकी बहीण योजनेचे श्रेय एकटेच घेत आहेत, असा आरोप इतर पक्षातील मंत्र्यांनी केला आहे. त्यावर आपण लवकरच या योजनेच्या अनुषंगाने एसओपी आणू, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्र्यांना शांत केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

जनन्समान यात्रा हा पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम अजित पवार यांची जनन्समान यात्रा हा पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम आहे. त्यामुळे पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या जाहिराती आणि बॅनरवर केवळ अजित पवार यांचे फोटो असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.

पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम असल्यामुळे यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील किंवा इतर लोकांनी आक्षेप घ्यावा, असे वाटण्याचे काहीही कारण नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी म्हटले आहे.

ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी अनाथांचा नाथ म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे होर्डिंग लागले होते. म्हणजेच ते होर्डिंग लावण्याची तयारी देखील आधीच झाली होती. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकट्याने श्रेय का घ्यावे? असे म्हणालो नव्हतो, असे देखील उमेश पाटील यांनी म्हटले आहे.

TAGGED:Ajit PawarBjpEknath shindeMaharashtraShivsena
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article Hello world!
Next Article “सोडूनिया भाजपाची साथ, पाऊले चालती काँग्रेसची वाट” साकोली विधानसभेत भाजपला धक्का!
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account