>>>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
राज्यात होणार्या आगामी विधानसभाकरीता निवडणूकाच्या तारखा चुनाव आयोगातर्फे घोषित होण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे तिकीट वाटपा संदर्भातील चर्चांना वेग आले आहे.
हेही वाचा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा
भंडारा-पवनी विधानसभे मधील शिवसेनेचे (उबाटा) स्थनिक इच्छुक उमेदवार यांना पक्षाने त्यांचे पद तात्पुरते गोठवले असून भाजप पक्षातून निवड आमदार होण्याच्या उद्देशाने बाहेरून आलेल्या उमेदवाराबाबत स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध दिसून येत असल्याची चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस मध्ये दावेदारीची मागणी करणारे उमेदवार हे फक्त पक्षाच्या नावावर निवडून येण्यासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी अटोकाट प्रयत्न करीत असून त्यांचे अस्तित्व जमिनीवर नसून फक्त पोस्टरवर दिसून येते. विधानसभेसाठी हे उमेदवार निवडणूकीत उगवत आल्याने सद्या काँग्रेस पक्षात सक्षम नेतृत्व दिसून येत नसल्याचे शहरात चर्चेला उधाण आहे.
हेही वाचा : गोंदियाचे विनोद अग्रवाल यांचे निलंबन मागे
त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे महत्वपूर्ण घटक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष शरदचंद्र पवार पक्ष नव्याने अस्तित्वात आला तेव्हा पासून भंडारा जिल्ह्यात मोठया उत्साहाने काम करत असून त्याचे असर लोकसभेत दिसून आले आहेत. करिता भंडारा-पवनी विधानसभा मध्ये शरद पवार यांच्या पक्षाकडून ४ उमेदवारांनी उमेदवारीकरिता नुकतेच पुणे येथे मुलाखती दिल्या आहेत.
विशेष म्हणजे , मागील दशका पासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले सामान्यांच्या समस्येवर धावणारे तसेच तात्काळ उपाययोजना शोधून नागरिकांचे प्रश्न सोडविनारे अजय मेश्राम यांच्या नावाची चर्चा युवा, ज्येष्ठ तसेच समाजस्तरावर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यांचे नाव नागरिकांच्या पसंतीवर (सर्व्हेनुसार) असल्याची देखील माहिती पुढे येत आहे.
शरद पवार यांच्या पक्षाची तिकीट जरी तुमसर येथील असली तरी भंडारा विधानसभेतही शरद पवार हे आपल्या कोट्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याने यात काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारा विधानसभेमध्ये महाविकास आघाडीची टक्कर ही सरळ भाजपशी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु विरोधात सक्षम असे उमेदवार दिसून येत नसल्याने यात महाविकास आघाडीची सरशी लागण्याची चिन्हे दिसून येत आहे.

