>>>>>>भंडारा चौफेर | साकोली प्रतिनिधी
भजनी मंडळी भजनाचा कार्यक्रम आटोपुन एका टेम्पोने स्व:गावी निघाले असता नाल्यावरील पुलावरून हा टेम्पो पाण्यात कोसळला. या अपघातात टेम्पो मधील १५ ही जण नाल्याच्या पाण्यात कोसळलेत. तर यात नव्या इंद्रराज वाघाडे (वय ८वर्षे) व प्रीयांशी मोरेश्वर वाघाडे(वय ४वर्षे) या दोन अल्पवयीन बालिका पाण्यात वाहून गेल्यात.
शोधमोहीमे नंतर २७ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास प्रियांशी वाघाडे या मुलीचा मृतदेह मिळाला आहे. तर १३ जण पाण्याच्या बाहेर निघाले.१३ ही जण किरकोळ जखमी आहेत. ही घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणाऱ्या खांबा ते वडेगाव या मार्गावर(२७ता.) ला पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.
या, घटनेची माहिती होताच साकोलीचे तहसीलदार निलेश कदम हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने नाल्यात पडलेला टेम्पो बाहेर काढून एसडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मुलींचा शोध सुरू केला आहे.
भिवखिडकी येथे ताजमेहंदी बाबा यांच्या भजनाचा कार्यक्रम गुरुवार दिनांक २६ सप्टेंबरला होता.तो कार्यक्रम आटोपून शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबरला पहाटे चार वाजता भिवखिडकी वरून हा टेम्पो निघाला. दरम्यान भजनी मंडळी घेऊन निघालेला १५ लोकांचा समावेश असलेला टेम्पो साकोली तालुक्यातील खांबा-वडेगाव मार्गावरील नाल्यामध्ये उलटला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय महसूल अधिकारी अश्विनी मांजे, तहसीलदार निलेश कदम,साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. टेम्पोला पाण्यातून काढण्यासाठी जेसीबी बोलवण्यात आली.या टेम्पोतील१३ जन सुखरूप बाहेर निघाले. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दुसऱ्या मुलीचे शोध कार्य प्रशासनाकडून सुरू आहे.